इतर बातम्या

प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र सुरु करणार : राजकुमार बडोले

पंढरपूर - अनुसूचित जातीनवबौद्ध घटकातील युवक स्वयंरोजगारात पुढे यावेतत्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावेयासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मौजे नजिक पिंपरीता.मोहोळ येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलांमुलीकरीता बांधण्यात आलेल्या शासकीय शाळेच्या उद्घाटनप्रसंगी बडोले बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री विजय देशमुखसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेआमदार प्रशांत परिचारकमाजी मंत्री लक्ष्मण ढोबळेमोहोळ पंचायत समितीच्या सभापती समता गावडे-सोनटक्केसरपंच रामचंद्र हळनूर, नगराध्यक्ष रमेश बारसकर,  समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त पी.एस. कवठे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते.

बडोले म्हणालेआर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ नोकरी मिळवण्याबरोबच उद्योजक होवून आपली आर्थिक क्षमता वाढवली पाहिजे. तसेच शाहूफुलेआंबेडकर यांचे विचार आपल्या देशात स्वातंत्र्यसमता व बंधुत्वाचा विकास करणारे विचार असून विद्यार्थ्यांनी याच विचाराचा वारसा पुढे चालवावा. प्रत्येक मागास व गरजू विद्यार्थ्यांनी निवासी शाळेचा उपयोग करुन स्वत:ला सक्षम करावे. विद्यार्थ्यांना निवासी शाळेत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

देशमुख म्हणाले कीआर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच निवासासाठी वस्तीगृहाची आवश्यकता असते. यासाठी सोलापूर शहरात दोन व सांगोला तालुक्‍यासाठी एक वस्तीगृह व्हावे तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक संस्थाकडे असलेल्या खाजगी वस्तीगृहाचे पुनर्जीवन करण्यात यावेअशी अपेक्षा व्यक्त केली.

कांबळे म्हणालेआर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांचा सामाजिकआर्थिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात एक वसतीगृह बांधण्यात येणार आहे.

कुमार कदम यांचा ब्लॉग..