इतर बातम्या

गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम : देवेंद्र फडणवीस

नांदेड  - गुरु गोविंद सिंगाचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपल्या समाजाचे गुलामीपासून व संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण परिवाराचे बलिदान करुन एक लढवय्या पंथाची स्थापना केली. त्यामुळे गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.  

नांदेड येथील गुरुद्वाऱ्यामध्ये श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सर्वश्री सरदार तारा सिंगहेमंत पाटीलडॉ. तुषार राठोडराम पाटील-रातोळीकरसचखंड गुरुद्वाराचे संतबाबा कुलविंतसिंगजीगुरुद्वारा लंगरसाहिबचे संतबाबा बलवंसिंगजीनांदेड परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक चिरंजीव प्रसादजिल्हाधिकारी अरुण डोंगरेमाजी आमदार ओमप्रकाश पोकर्णासंतुक हबर्डे उपाध्यक्ष स. भुपिंदर सिंग मिनहाससचिव स. भागिंदर सिंग घडीसाजचेअरमन-शिक्षण समिती स. अमरीक सिंग वासरीकरचेअरमन-स्टाफ कमेटी स. सरजीत सिंग गिलचेअरम-ईस्टेट कमेटी स. राजिंदर सिंग पुजारीसदस्य स. शेर सिंग फौजीस. गुरमित सिंग महाजन,  स. दलजीत सिंगहैद्राबादस. गुरदीप सिंग भाटियास. अवतार सिंघ मक्कडस. गुरिन्दर सिंग बाबास. इकबाल सिंग सबलोकस. रघुजीत सिंग विर्कस. सुरिन्दर सिंगस. परमजोत सिंग चाहेलस. रणजीत सिंगकामठेकर,  उपजिल्हाधिकारी तथा चेअरम व्यवस्थापन समिती श्रीमती अनुराधा ढालकरीसदस्य व्यवस्थापन समिती स. गुलाब सिंग कंधारवालेस. नौनिहाल सिंग जागीरदारस. रविंदर सिंग बुंगई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीनांदेड येथील गुरुद्वारात येवून गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतल्यानंतर नवीन ऊर्जा मिळते. गुरु गोविंद सिंग यांनी या पंथास बलिदानाची विशेष परंपरा प्राप्त करुन दिली असून त्यांनी स्वाभिमानी समाजाची निर्मिती केली. भक्ती व शक्तीच्या रुपाने गुरु गोविद सिंग यांनी भारताला नवीन मार्ग दाखविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   

राज्य शासनाने गुरुत्तागद्दीच्या वेळेस गुरुद्वारा बोर्डास कर्जस्वरुपात दिलेले ६१ कोटी रुपयांचा निधी माफ करण्यात येईल. तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या निवासाकरिताच्या भूखंडावर असलेले आरक्षण रद्द करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. गुरु गोविंद सिंग यांचा जयंती दिन म्हणजे २२ डिसेंबर रोजी राज्यात राज्य शासनामार्फत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात येईलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून गुरुद्वारा परिसरातील सर्व प्रकारची मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याची कारवाई लवकरच करण्यात येईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.   

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. त्यावेळी पंचप्यारे साहिबांच्यावतीने गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंगजी यांनी फडणवीस यांचा पारंपरिक पध्दतीने केसरी चोलापगडीशिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा बोर्डामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव विशेषांकाचे विमोचन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.    प्रास्ताविक गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार तारा सिंग यांनी केले तर सरदार सरजीतसिंग गिल यांनी आभार मानले.  

कुमार कदम यांचा ब्लॉग..