इतर बातम्या

मालवणी महोत्सवात प्रचंड उत्साहात रंगला " खेळ पैठणीचा "

ठाणे - शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवाचा रविवारचा दिवस महिलांसाठी खास ठरला. रविवार असल्याने खरेदीसाठी तसेच मालवणी फूडचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली. यावेळी आय़ोजित " खेळ रंगला पैठणीचा. खेळात महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

 कोकण ग्राम  विकास मंडळातर्फे शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार हा सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी यथेच्छ पणे मालवणी महोत्सवाचा मनमुराद आंनद लुटला. येथील मसाल्याच्या पदार्थांची खरेदी केली. तसेच मालवणी पद्धतीच्या खाद्यपदार्थांवर ताव मारला.

 मालवणी महोत्सवाला भेट देण्याऱ्या लोकांमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा प्रभाव दिसून येत होता. त्याच निमित्ताने आयोजकांकडून " खेळ पैठणीचा " हा कार्यक्रम घेण्यात आला. या खेळात १०० हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी या पैठणीच्या खेळाला सुरेख प्रतिसाद दिला. यामध्ये एकूण ५ स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधून प्रत्येक खेळातून ४ असे २० महिला स्पर्धक १२ जानेवारीला होणाऱ्या अंतिम फेरी साठी निवडण्यात आले. या ५ स्पर्धेतील खास एका स्पर्धेत " सैराट " फेम " झिंगाट  " गाण्यावर सर्व महिलांनी भाग घेत आपली अंतिम फेरीत निवड होण्यासाठी नृत्यकौशल्य पणाला लावले. 

यावेळी खेळ रंगला पैठणीचा हा बहारदार  कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुल डेंगळे आणि निनाद सुतार यांनी अगदी सुरेखपणे पार पडले. यावेळी परीक्षकाच्या भूमिकेत आयोजक तसेच स्थानिक मान्यवर सहभागी झाले होते.

कुमार कदम यांचा ब्लॉग..