इतर बातम्या

पाचोरा येथील महाआरोग्य शिबीरास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव - ग्रामीण महाआरोग्य शिबिर रविवारी पाचोरा येथे संपन्न झालेया शिबिराचा पाचोरा व भडगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातील लाखो रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराच्या ठिकाणी नेत्ररोग,  मेंदू रोग, मनोविकार अनुवंशिक विकारदंताचे विकारश्वसनाचे विकारहृदयरोगलठ्ठपणाहाडांचे आजारस्त्रीरोगबालरोगप्लॉस्टिक सर्जरी तपासणीकाननाक व घसा यांचे आजारकर्करोग,  त्वचारोगमूत्ररोग या आजारांची तपासणी तसेच आयुष विभागाचा कक्ष सुरु करण्यात आले होते.  

या शिबीरात ज्या रुग्णांना सोनाग्राफीएमआरआरसिटीस्कॅनएक्सरेडुडीइकोइसीजी करण्याची आवश्यक होती अशा रुग्णांना तपासणी करण्यासाठी त्यांच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जळगाव येथे नेण्याची व आणण्याची  व्यवस्था करण्यात आली होतीतसेच ज्या  रुग्णांची शस्त्रीक्रिया करणे आवश्यक होते अशा रुग्णांना स्टिकर देण्यात आले होते.  उद्यापासून या रुग्णांच्या घरी  डॉक्टर व कर्मचारी जावून माहिती घेणार आहेतया रुग्णांचा  मुंबईपुणेनाशिकनागपूर येथील उपचाराचा सर्व खर्च मायलॉन कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून  संपन्न झालेल्या पोचारा येथील भव्य महाआरोग्य शिबीरात पाचोरा व भडगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेण्यासाठी मोठया संख्येने गर्दी केली होती.

या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री  गिरीश महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आलेयावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वलाताई पाटील,उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजनआमदार हरिभाऊ जावळेआमदार चंदुलाल पटेलआमदार स्मिताताई वाघजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरपोलीस अधीक्षक दत्तात्राय कराळे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉएनएसचव्हाणजामनेरचे नगराध्यक्ष सौसाधनाताई महाजनभडगावचे नगराध्यक्ष राजेंद्र पाटीलपाचोराचे नगराध्यक्ष संजय गोहीलजिल्हा परिषद सभापती पोपट तात्या भोळे,  प्रभाकर सोनवणेदिलीप पाटीलमाजी आमदार दिलीप वाघउदय वाघविविध शहरांमधून आलेले तज्ज्ञ डॉक्टर यांच्यासह इतर मान्यवर मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री  गिरीश महाजन म्हणालेपाचोरा भडगाव हे दोन मिळून महाआरोग्य शिबीर घेण्यात आले आहेया शिबीरात संपूर्ण जनसागर लोटला आहेया शिबीरात रुग्णांना औषधे मोफत दिला जात आहेरुग्णांना भोजनाची विनामुल्य व्यवस्था करण्यात आली आहेमुंबईपुणेनाशिक येथील डॉक्टर्स येथे येवून रुग्णांची तपासणी करीत आहेअसे  डॉक्टर जेव्हा रुग्णांची तपासणी करतात त्यावेळी रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.  पैसे अभावी बऱ्याच लोकांच्या आजारावर उपचार होत नाहीअशा उपेक्षित लोकांच्या उपचाराची जबाबदारी या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून घेण्यात आली आहेयासाठी कोणालाही खर्च करण्याची आवश्यकता नाही.  याशिबीरासाठी अनेक दानशूर व्यक्तीसंस्था यांनी मदत केली आहे.  प्रत्येक आठवड्यात आरोग्य शिबीर घेण्यात येत असूनही या या शिबीरांमध्ये गर्दी होत असतेयावरुन समाजातील  लोकांना आरोग्याची गरज आहे.  यासाठी जळगाव येथे मेडिकल हब सुरु करण्यात येत आहेयेणाऱ्या काळात मोठ्या शस्त्रक्रीयाउपचारासाठी कोठेही जाण्याची गरज नाहीसर्व सुविधा जळगावात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेपाचोरा येथे एक मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहेज्या रुग्णांना तातडीची उपचाराची गरज आहे अशा रुग्णांना  उपचारासाठी  मुंबईपुणेनाशिक यासारख्या ठिकाणी पाठविण्यात येणार आहेशिबीर संपल्यानंतरही ही सुविधा नागरिकांना देण्यात  येणार आहेभविष्यात जे रुग्ण असतील त्यांनी फक्त्‍ आमच्यापर्यंत पाठवात्यांची पुढील जबाबदारी आम्ही घेवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार हरिभाऊ जावळे यावेळी म्हणालेशेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा देण्याच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील सलग दुसरे महाआरोग्य शिबीर पाचोरा येथे संपन्न होत आहेफैजपूर येथील शिबीराचा अनुभव नवीन होता.  या शिबीरात डॉक्टर्स यांच्यासह आशा कर्मचारीस्वयंसेवक जीव ओतुन काम करीत आहेतयासाठी इश्वरीय शक्ती लागतेही शक्ती गिरीष महाजन यांच्याकडे आहेही शक्ती त्यांना ज्या उर्जेतून मिळते त्याच उर्जेतून आपणही शक्ती घ्यावीशेवटच्या रुग्ण तपासणीपर्यंत डॉक्टर्स शिबीराच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळक यावेळी म्हणालेपहिल्या ग्रामीण महाआरोग्याचा अनुभव फैजपूर येथील शिबीरात मिळालापाचोरा येथे दुसरे शिबीर संपन्न होत आहे.रुग्णांना मुंबई – पुणे येथे घेवून जाणे व परत आणणे हे काम जीएमफाऊंडेशनमार्फत होत आहेअसे शिबीर संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेया शिबीरांचा जनतेला निश्चितच उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले यावेळी जी.एमफाऊंडेशतर्फे पाच ॲम्बुलन्स व  शेवपेटया जळगाव जिल्हयासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेतजिल्हयासाठी एकूण १७ ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत

या शिबीरात येणाऱ्या रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी  शिबीराच्या ठिकाणी चौकशी कक्षपुरुषांसाठी व महिलांसाठी प्रसाधन गृह होतेया शिबीरास आरोग्यमहसुलपोलीस विभागाच्या यंत्रणेने मोठया प्रमाणात सहकार्य केले.  पुढील शिबीर पारोळा-अमळनेर हे दोन तालुके मिळून होणार आहे.

जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण : राम शिंदे

नाशिक -  जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पण बदलत्या स्थितीनुसार शेतीसाठी मुबलक पाणी वापर करु नयेपीकनिहाय ठिबक अथवा स्प्रिंकलर सारख्या सिंचन पध्दतीने पाण्याचा नियंत्रीत वापर करावा असे आवाहन राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले आहे.

येवला तालुक्यातील कातरणी येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहाणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.  शिंदे यांनी रविवारी येथील वनविभागकृषी विभागांनी केलेल्या कामांची पाहाणी केलीतसेच तालुक्यातील विसापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळेविहीरींच्या पाणी पातळीची पाहाणी करुन त्यांनी आढावा घेतलायावेळी त्यांचे समवेत उपवनसंरक्षक रामानुजमजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी टी.जगतापकार्यकारी अभियंता शिंदेउपविभागीय अधिकारी भिमराव दराडे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणालेजलयुक्त शिवार योजनेतून राज्यात झालेल्या कामाचा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे दिसून आले आहे.जीडब्लूएस या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये  जमीनीतील पाणीपातळी वाढल्याचे दिसून आले आहेयाची प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी नाशिक विभागातील तीन जिल्ह्यातील गावांमध्ये अचानक पाहाणी दौरा करत असून शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा शासनाचा उद्देश आहे.

ते म्हणालेया गावांमध्ये विहीरींना पूर्वी पावसाळ्यानंतर पाणी राहात नव्हते असे शेतकऱ्यांचे म्हणणे होतेपण आता या कामांनंतर सध्या पाणी असून त्यामध्ये कांद्याचे पीक घेतले जात असल्याचे दिसून आले आहेया पाण्यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहेजलयुक्त योजनेतून यालुक्यात व जिल्ह्यातील अधिकाधिक गावांमध्ये कामे घेण्याचे नियोजन शासनाच्या विविध विभागांकडून केले जात आहेभविष्यात याचा फायदा मिळेलअसे मंत्री शिंदे म्हणाले.

जलसंधारण मंत्री शिंदे म्हणालेशासनाने केलेल्या कर्जमाफीची रक्कम चार महिन्यांच्या कमी कालावधीत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेसर्व शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून त्यासाठी जमीनीची मर्यादा देखील काढून टाकल्याने सर्वांना लाभ मिळणार आहेकर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना त्यातील मंजूरी सहीत बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याचे संदेश मिळतीलयासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक देखील घेण्यात आले होतेराज्यातील शेतकऱ्यांना ३५हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देता यावी यासाठी विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये २० हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली व उर्वरित तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात येईल असे मंत्री शिंदे म्हणाले.

मंत्री राम शिंदे यांनी  सौंदाणे येथील जलयुक्त शिवार योजनेतून जलसंपदा विभागाने केलेल्या कामांची पाहाणी करुन बंधाऱ्यातील पाणी साठ्याचे जलपूजन करुन त्याचे लोकार्पण केले.

यावेळी मंत्री शिंदे म्हणालेजलयुक्त शिवार मधून येथे परसूल नदीवर आठ साखळी साठवण बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले होतेत्यापैकी सात बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून त्यामधील त्यापैकी या २५ टीसीएम पाणी साठा असलेल्या बंधाऱ्यातील पाणी साठ्याचे जलपूजन करण्यात येत असल्याचे समाधान आहे.

ते म्हणालेजलयुक्त शिवार योजनेतील कामांचा फायदा दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहेअशा कामांची मागणी वाढत आहे त्याचबरोबर लोकांनी याकामांसाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग द्यावा असे आवाहन जलसंधारण मंत्री शिंदे यांनी केले.

यावेळी त्यांनी सौंदाणे येथील कामांची पाहाणी करुन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली.  यावेळी त्यांचे समवेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी टी.जगतापकार्यकारी अभियंता शिंदे आदी उपस्थित होते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा खोडा

पनवेल - पळस्पे ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात सुरू असलेल्या दिरंगाईचे जिल्हाधिकारी आणि भुसंपादन अधिकाऱ्यांना अजिबात गांभीर्य वाटत नाही. अनेक ठिकाणी भुसंपादनाची प्रक्रिया रखडली असल्यामुळे महामार्गाचे काम गती घेण्यास तयार नाही. त्यातच पाऊस आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे महामार्ग अंतिम संस्काराच्या प्रतिक्षेत आहे. तरीदेखील जिल्हाधिकारी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे सांगत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसे खरमरीत पत्र कडू यांनी सूर्यवंशी यांना ईमेलद्वारे पाठवले आहे.

गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी संपर्क साधून मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे- इंदापूर महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत ठोस निर्णय घेण्याची आग्रही भूमिका विषद केली. आपणही त्या मार्गावरून परवाच अलिबागला आलो, असे सांगत महामार्गाच्या  दुरवस्थेबाबत कबुली देत बैठक बोलावण्याची ग्वाही सूर्यवंशी यांनी कडू यांना  दिली. त्यानुसार संघर्ष समितीने सहा मागण्यांचे निवेदन तात्काळ जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना त्यांच्या शासकीय ई-मेलवरून पाठवून दिले. 

त्यामध्ये महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून चाकणफाटा मार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांना सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत बंदी घातली आहे, त्या धर्तीवर इथेही अंमलबजावणी व्हावी. त्यामुळे वाहनांच्या कमी वर्दळीमुळे कामाला गती येवू शकेल. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि कोकण पर्यटनाला मजबूती देणाऱ्या महामार्गाच्या कामात अद्याप ३५ ठिकाणी भू-संपादनाचे काम रखडलेले असल्यामुळे ती प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करताच, बहुधा जिल्हाधिकारी कार्यालयाचे पितळ उघडे पडलेले दिसते, त्यामुळेच आश्वासन देवूनही ते संघर्षसोबत बैठक घेण्यास टाळाटाळ करित असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे.

ठेकेदार सुप्रीम इनफ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनी महामार्गाच्या कामात असंवेदनशील आहे. गेल्या दोन वर्षापासून चौपदरीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असून महामार्गाला तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज आहे. जुना मार्ग दुरुस्त अथवा डागडुजी करून नव्या कामाला गती देणे खुप महत्वाचे असताना प्रवाशांच्या जीवाशी ठेकेदार आणि जिल्हाधिकारी खेळत आहेत. त्यातच सुप्रिम नावाचा ठेकेदार काळ्या यादीत असल्याची चर्चाही सुरू असताना रायगड आणि कोकणवासियांच्या प्रवासात खोडा घालण्याचे काम प्रशासन करीत असल्याचा आरोप कडू यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्यावर केला आहे. या सर्व प्रकारात ते दोषी असल्यानेच संघर्ष समितीच्या रोषाला सामोरे जाण्यास घाबरत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा दावा कांतीलाल कडू यांनी केला आहे.

ठेकेदार करत असलेल्या कामात काळंबेरं असल्याने कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ पथकाची संघर्ष समितीच्या सदस्यांसह सुकाणु समिती नेमावी, अशा महत्वपूर्ण मागणीचा समावेश निवेदनात करण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांची डोकेदुखी वाढली की काय?, असा संशय कडू यांनी व्यक्त केला आहे.

बैठकीला रायगड आणि नवी मुंबईतील पोलिस, वाहतूक अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-संपादन अधिकारी, संबंधित तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच जिल्हा माहिती अधिकारी आदींना बोलावून बैठकीचे इतिवृत्त लिहिण्याच्या मागणीसह महामार्गावर अपघातातून मृत्युमुखी पडलेल्या अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी किंवा ठेकेदाराकडून वसूल करून द्यावी असाही मुद्दा मांडण्यात आला होता. हे खरमरीत निवेदन वाचून बैठक बोलाविण्यास जिल्हाधिकारी कचरत आहेत. त्या॑नी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, काम प्रगतीपथावर होईल, असे  कडू यांना सांगून त्यांची हतबलता दर्शविली असल्याचा आरोप करून, यापुढे एकही प्रवासी अपघातात मृत्युमुखी पडला तर जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? अशी विचारणाही त्यांना पाठविलेल्या दुसऱ्या निवेदनातून संघर्ष समितीने केली आहे.

अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला प्रथम पसंती : सुभाष देसाई

नवी दिल्ली - पतंजलीकोकाकोलापेपस्किोऍमेझोनब्रिटानिया या कंपन्यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी प्रथम पसंती दर्शवीली असल्याचीमाहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी  दिली.विज्ञान भवनातील सभागृह क्रमांक चार मध्ये ‘महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग’ याविषयीवरील परिसंवादांत बोलताना देसाई यांनी ही माहिती दिली. या परिसंवादात राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरउद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवालकृषी व फालोत्पादन प्रधान सचिव बिजय कुमारभारतीय उद्योग संघांचे उपाध्यक्षबी. थैयरंगराजन उपस्थित होते. यासह सहभागीमध्ये दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकरमहाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारीप्रतिनिधिंमध्ये प्रस्थापित उद्योजक,आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी शिष्टमंडळेनवोदित उद्योजकमोठा संख्येने उपस्थित होते.

वर्ल्ड फुड इंडिया-२०१७ मध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योंग मंत्रालयसोबत करार झाले आहेत. याअंतर्गत ६५ हजार कोंटीपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात होणार आहे.  यामध्ये प्रमुख कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी पसंती दिली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणूकीमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ५० टक्केपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. जागतिक बँकेने नुकतेच जाहीर केल्यानुसार उद्योग क्षेत्रात भारताने १३० व्या स्थानाहून १०० व्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूकही महाराष्ट्रामध्येच आली असल्याचे विवरण आहे. यावरून महाराष्ट्र हे उद्योगप्रिय राज्य असल्याचे जागतीक पातळीवरून शिक्का र्मोतब झाल्याचे स्पष्ट होतेअसे देसाई म्हणाले.

आंबाडाळिंबसंत्राद्राक्षेकेळीसफरचंदलसूनकांदाहिरवी मिर्चीअसे अनेक फळ-भाज्या आज निर्यात होत आहेत. याशिवाय आणखी अन्य खादयपदार्थ निर्यात होऊ शकतात. यासर्व प्रक्रियेमध्ये गुणात्मक वाढ होण्याची गरज असून त्या दिशेने महाराष्ट्र शासन पाऊले उचलीत आहे. असे सांगून गुंतवणूकदांरासाठी अधिक मैत्रीपुर्वक वातावरण निर्माण करीतअसल्याचे देसाई यांनी यावेळी म्हणाले. यातंर्गत मेगा फुडपार्क उभारण्यात येत आहेत. यामध्ये विविध सोयी पुरविल्या जातील. यासह शितगृहेही उभारली जात आहे. यासर्वांमुळे मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईलअसेही देसाई यावेळी सांगितले. देशातंर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन यावेळी देसाई यांनी केले.

याकार्यक्रमात काही गुंतवणूकदारांनी तसेच नवोदित उद्योजकांनीही त्यांना स्थानिक स्तरावरी भेडसावणा-या समस्यांविषयी प्रश्न विचारली यावर देसाई यांनी समाधानकारक उत्तरे दिली. 

विज्ञान भवनात सुरू असलेल्या परिसंवादाच्या प्रश्नोत्तर सत्रात तरुण नवोदित उद्योजक अमोल बिराजदार यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ऊसावर प्रक्रिया करून गुळ बनविण्याचा उद्योग सुरू करीत आहेत. त्यांना स्थानिक प्रशासनाकडून २४ तास वीज मिळावी यासाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याबाबत सांगितले. यावर उद्योग मंत्री यांनी  तत्काळ ही समस्या सोडविण्याबाबत आश्वस्त केले.

याप्रसंगी ट्रेन्ट हायपर मार्केट प्रा. ली. चे व्यवस्थापिकय संचालक जमशेद डाबुगोदरेज टायसन फुड ली. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद दास यांनी महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाविषयी माहिती दीली.  महाराष्ट्र शासन उद्योग क्षेत्राला अधिक पोषक बनविण्यासाठी उद्योगांकडून सुचना मागवित असून त्या सूचनांचे पालन करीत असल्याचेही या मंचावरून सांगितले. यावेळी बिजय कुमार,  सुनिल पोलवाल यांनीही राज्यांच्या कुषीफलोत्पादनउद्योग धोरणांची माहिती दिली.

कुमार कदम यांचा ब्लॉग..