इतर बातम्या

धुळे मनपात काँग्रेसच विजयी होणार - माणिकराव ठाकरे

धुळे - धुळे शहरातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. शहराच्या विकासासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होते आहे. त्यामुळे धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होणार, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा:धुळे मनपात काँग्रेसच विजयी होणार - माणिकराव ठाकरे

विविध विभागांवरील नियंत्रणासाठी स्थायी समित्या आवश्यक – सुभाष देसाई

नागपूर - विधानमंडळाच्या कामकाजामध्ये समित्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून विविध विभागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थायी समिती असणे आवश्यक असल्याचे मत विधानसभा सदस्य सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केले.
राष्ट्रकूल संसदीय मंडळाच्या ४३ व्या संसदीय अभ्यासवर्गामध्ये ‘विधानमंडळाच्या समित्यांचे कामकाज’ या विषयावर देसाई मार्गदर्शन करीत होते. यावेळी विधानसभा सदस्य चिमणराव पाटील उपस्थित होते.

अधिक वाचा:विविध विभागांवरील नियंत्रणासाठी स्थायी समित्या आवश्यक – सुभाष देसाई

राष्ट्रवादी कॉंग्रेस मेळाव्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन

नाशिक – येत्या २५ डिसेंबर  रोजी नाशिक येथे ना.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या मेळाव्याच्या नियोजनाकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
नाशिक येथे राष्ट्रवादी भवन यां राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष ना.शरद पवार यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर नाशिक येथील बी.डी भालेकर हायस्कूल मैदानावर मेळावा होणार आहे. सदर मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन करण्यात आली असून कार्यकर्त्याच्या मदतीकरिता समिती कार्यान्वयित राहील.

अधिक वाचा:राष्ट्रवादी कॉंग्रेस मेळाव्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन

व्दिवार्षिक विवरणपत्र दाखल करण्याचे उद्योग समुहांना आवाहन

नवी मुंबई - खाजगी क्षेत्रातील कर्मचा-यांचे व्यावसायिक तथा शैक्षणिक अर्हतेच्या आधारे संकलीत करण्यात येणारे व्दिवार्षिक ई-आर-२ विवरणपत्र (सप्टेंबर २०१३) ऑनलाईन भरण्यात यावे. उद्योजकांनी कर्मचा-यांच्या बाबतीत अचूक माहिती द्यावी. याबाबतचा तपशील www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उद्योजकांनी ही अचूक माहिती लवकरात लवकर भरावी, असे आवाहन सहाय्यक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,ठाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

कुमार कदम यांचा ब्लॉग..