इतर बातम्या

पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून युवकांनी उद्योजक व्हावे : महादेव जानकर

पुणे - दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे. अंड्यांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृतीव्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल. या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्याने पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतातअसे प्रतिपादन पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारातील अंड्याचे पोषणमूल्य नागरिकांपर्यंत पोहोचविणेकुक्कुट पालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरपुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताया कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापटकेंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्राच्या निर्देशक भारती सिंहकृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाईबाजार समितीचे चेअरमन दिलीप खैरेसहआयुक्त डॉ. गजानन राणे,वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे आदी उपस्थित होते.

बापट म्हणालेआरोग्याच्या दृष्टीने अंड्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आजच्या काळात महिलांची शारीरिक स्थिती अवघड आहे. यासाठी महिलांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करावा. अंडी उत्पादन घराघरात व्हावे यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. एक सजग नागरिक म्हणून युवकांनी या मोहिमेचा प्रसार करावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे तालुका समन्वयक शिल्पा ब्राह्मणे यांनी शिरूर तालुक्यातील स्वयंसहायता महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या अंडी उत्पादन व्यवसायाच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल माहिती दिली.

आहारतज्ज्ञ डॉ. गीता धर्मती यांनी आहारातील अंड्याचे महत्वत्यातील महत्वाचे घटक याविषयी माहिती दिली. तसेच अंड्याविषयी असणारे गैरसमज याबद्दल शंकानिरसन केले. यावेळी उपस्थितांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले. सूत्रसंचालन आशिष जरद यांनी केले तर आभार अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी मानले.

फवारणीमुळे बाधित झालेल्या शेतकरी कुटूंबियांना तात्काळ मदत देणार

नागपूर - शेतपीकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्यांचा दुरदैवी मृत्यूमुळे शेतकरी कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. अशा प्रसंगी शासनातर्फे आवश्यक ते संपूर्ण सहाय्य करण्यात येईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी या दूर्दैवी घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी जावून कुटूंबियांचे सात्वन केले तसेच मदतीचा विश्वास दिला.

कळमेश्वर येथील मृतक शेतकरी माणिकराव सदाशिव शेंडे यांच्या निवासस्थानी भेट देवून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीमती वंदना माणिकराव शेंडे व मुलगा वैभव शेंडे यांची भेट घेवून त्यांचे सात्वन केले. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख त्यांचेसमवेत उपस्थित होते.

मौजा पिपळारीठी येथे शेतपीकांवर किटकनाशक फवारणी करताना प्रकृती खराब होवून विषबाधेने उपचारादरम्यान शेतकरी माणिक सदाशिव शेंडे यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या शेतात पी.एस. ग्रासिल नावाचे औषध शेतपीकांवर फवारणी करतेवेळी बेशुध्द झाल्याचे कळताच त्यांना उपचारासाठी कळमेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. त्यानंतर आरेंजसिटी हॉस्पीटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.  या दुरदैवी घटनेमुळे शेंडे कुटूंबियांवर मोठा आघात झाला असून घरातील कर्तापुरुषाचे निधन झाल्यामुळे शेतकरी कुटूंबास अपघात विमा योजनेसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना तहसिलदार डॉ. हंसा मोहन यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

शेतपीकांवर औषध फवारणी करताना वापरण्यात आलेल्या किटकनाशकाच्या खरेदी संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशा सूचना देताना पालकमंत्री म्हणाले कीपत्नी वंदना माणिक शेंडेमुलगी उज्वलाप्रिया व रिनातसेच मुलगा वैभव व प्रशांत यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. या कुटूंबांवर घडलेल्या दुरदैवी घटनेमुळे शासनातर्फे तसेच वैयक्तिकही कशी मदत करता येईल यादृष्टीनेही प्रयत्न असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री यांनी काटोलनरखेड तालुक्यातील शेतपीकांवर औषध फवारणीमुळे मृत झालेल्या खैरगाव येथील धनजय कृष्णाजी वारोकर यांच्या निवासस्थानी जावून कुटूंबियांचे सात्वन केले. शेतपीकांवर फवारणी करताना दुरदैवी घटना घडू नये यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जावून फवारणी संदर्भात मार्गदर्शन करावेअशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात. तालुका कृषी अधिकारी जगदीश नेरुलवार यांनी कृषी विभागातर्फे कृषी विकास व कृषीपूरक उद्योगासाठी योजनाचा लाभ या कुटूंबियांना देण्यात येईल असे यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. राजीव पोतदारअरविंद गजभियेसंजय देकाटेकिशोर रेवतकरप्रकाश वरुडकरप्रकाश टेकाडेउकेश चव्हाणतसेच नगराध्यक्षा श्रीमती स्मृती इखार आदी उपस्थित होते.

प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

मुंबई - हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ते आज मंत्रालयात त्रिमुर्ती सभागृहात पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. नागरिकांनी निरोगी व प्रदुषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर ज्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे प्रदुषण वाढतेत्याचा वापर टाळायला हवा. पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड तरी लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. वर्षभरातील सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदुषणध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

प्रारंभी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रदुषण संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना श्री.तावडे त्यांनी उत्तरे दिली.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रास्ताविकात सांगितलेदेशातील भावी पीढीला पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्यावर शाळेतच पर्यावरणाचे रक्षण करण्याचे संस्कार झाले पाहिजे. दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर करु नये. येणारी दिवाळी ही प्रदूषणमुक्त साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केले.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री .फडणवीस यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली. यावेळी उपस्थित असलेल्या हंसराज मोरारजी पब्लिकस्कूलकुलाबा म्युनिसिपल स्कूल आणि युरो स्कुलच्या मुख्याध्यापकांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.

या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनपर्यटन मंत्री जयकुमार रावलमहाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष मिलिंद म्हैसकरअपर मुख्य सचिव सतीश गवईसदस्य सचिव डॉ.पी.अनबलगनतसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांच्या सहभागामुळे उद्योगक्षेत्राला चालना :राज्यपाल

मुंबई - उद्योग क्षेत्रात महिलांच्या सहभागामुळे देशातील आर्थिक व्यवस्थेला चालना मिळाली असून छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली आहे, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी सांगितले. महिला नव उद्योकांना सन्मानित करण्यासाठी डिझायन इनोव्हेशन क्रिएटीव्हिटी एन्टाप्रेनरशीप य संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यपाल पुढे म्हणाले, भारतात महिलांनी अनेक क्षेत्रात क्रांती घडविली आहे. पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली तर एकोणविसाव्या शतकात वाडीया परिवारातील मोतलीबाई वाडीया आणि जेरबाई वाडीया यांनी उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. शैक्षणिक क्षेत्रातही महिला आघाडीवर आहेत. महिलांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात त्यांची कामगिरी उत्तम ठरली आहे.

ग्रामीण भागातील चित्रही आता बदलले आहे. पूर्वी केवळ नामधारी सरपंच असलेल्या महिला आता प्रत्यक्ष काम करीत आहेत. ही एक चांगली सुरुवात आहे. मात्र अजूनही समाजाची महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भातील समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

हॉस्पीटल, शिक्षण या क्षेत्रातील प्रगती महिलांच्या सहकार्याशिवाय साध्य करता आली नसती. औद्योगिक क्षेत्रात महिलांनी अधिक संख्येने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. इंदू सहानी, श्रीमती राधा कपूर खन्ना यांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे राज्यपालांनी कौतुक केले आणि यावेळी सत्कार झालेल्या सर्व महिला उद्योजिकांचे अभिनंदन केले.

कुमार कदम यांचा ब्लॉग..