इतर बातम्या

अखिलेश यादव पुन्हा समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. आग्रा येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अखिलेश यांची निवड एकमताने झाल्याचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी जाहीर केले. कार्यकारिणीच्या या बैठकीत पक्षाच्या घटनेत बदल करुन अध्यक्षपदाचा कार्यकाल तीन वर्षांवरुन पाच वर्षांचा करण्यात आला. त्यामुळे अखिलेश यादव आता पुढील पाच वर्षांसाठी या पदावर राहतील.

मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी - राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई -  नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर २०१७ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे;तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेदेखील मतमोजणी केली जाईलअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते.  सहारिया यांनी सांगितले कीनांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एकूण २० पैकी चार सदस्य संख्या असलेल्या १९ प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्र.  ची व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रभागाच्या सर्व ३७मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाईल. हा वापर प्रायोगिक व प्रथमच असल्यामुळे या प्रभागातील मतमोजणी नेहमीच्या मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होणाऱ्या चिठ्ठ्यांद्वारेदेखील केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावीअसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१३ मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ४०० व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होतेत्यानुसार कंपनीने ४०० व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते;परंतु तांत्रिक अडचणीमुळे खरेदी तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली. मात्र या निवडणुकीत प्रायोगिक तत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावीअशी विनंती कंपनीने केली होतीअशी माहिती  सहारिया यांनी दिली.

कंपनीच्या विनंतीचा सखोल विचार करुन नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एका प्रभागात हे व्हीव्हीपॅट प्रायोगिक तत्वावर वापरण्यास कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यानुसार कंपनीने ७० व्हीव्हीपॅट २० सप्टेंबर २०१७ रोजी नांदेड महानगरपालिकेकडे पाठविले. व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक घेतली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक  ची निवड करण्यात आली. या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची देखरेख कंपनीचे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारीजिल्हा पोलिस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीची मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने नजर असेल. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहेअसेही  सहारिया यांनी सांगितले.

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत एकूण २० प्रभाग आणि ८१ जागा आहेत. १९ प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग ५सदस्यांचा आहे. एकूण  लाख ९६ हजार ८७२ मतदार असून त्यांच्यासाठी ५५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.२ वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी ७३४ मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.२ मध्ये मतदारांची एकूण संख्या २० हजार ३०७ इतकी आहे.

स्व.वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार सोहळा संपन्न

मुंबई -  राज्यातील भटक्या जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत स्व. वसंतराव नाईक यांच्या नावे पुरस्कार देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणेत्यांची शैक्षणिक प्रगती करणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी शासन कटीबद्ध आहेअसे प्रतिपादन विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागासवर्ग मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्यातून व विभागातून १० वी १२ वीच्या परिक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या ४१ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी प्रा. शिंदे बोलत होते.

विजाभज प्रवर्गातून १० वी व १२ वीच्या परीक्षेमध्ये राज्यात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्रत्येकी  लाख रोखस्मृतीचिन्ह तसेच विभागीय परीक्षा मंडळातून (बोर्डातून) सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्रत्येकी ५१ हजार रोख व स्मृतीचिन्ह यावेळी देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टिने व भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम व्हावे या उद्देशाने नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा शाससनाचा मानस असल्याचे सांगून प्रा.शिंदे पुढे म्हणाले,  हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांनी विमुक्त जमातीसाठी केलेले कार्य यावरुन  एप्रिल २०१७ पासून वि.जा.भ.ज. विभाग अस्तित्वात आला आहे. या अंतर्गत ९७०आश्रमशाळा कार्यरत आहेत. या शाळेत  लाख २८ हजार विद्यार्थी शिकत असून २३८४ कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद या विभागास आहे. या विभागामार्फत समाजातील प्रत्येक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून समाज्याच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे.

राज्यातील ९७० शाळांच्या मूल्यमापनासाठी संहिता तयार करण्याचे काम चालू आहे. लवकरच संहिता जाहीर करुन निर्गमित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वि.जा..समाजातील कुटुंबाना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी  लाख रुपयापर्यंतचे बिगर व्याजी कर्ज देण्याची योजना तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच स्कॉलरशिपच्या प्रश्नासंदर्भात डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणार आहे. जातपडताळणी संदर्भात रक्ताच्या नात्यातील एकाची जात पडताळणी झाली असेल तर पुराव्याची गरज असणार नाही. तसेच अनुसुचित जाती जमाती प्रमाणे विमुक्त जाती जमाती,भटक्या जमाती यांना क्रिमीलेअरची अट राहू नये असा प्रस्ताव विभागाच्या विचाराधीन आहे.

येरावार म्हणालेविभागातील प्रत्येक घटकाचे सामाजिकशैक्षणिकआर्थिक उन्नती साधणे हे आमचे ध्येय आहे. या विभागाच्या माध्यमातून विजाभज समाजाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे तसेच त्याची अंमलबजावणी गतीने होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागासवर्ग राज्यमंत्री मदन येरावारविभागाचे सचिव जे.पी.गुप्ताविजाभज संचालक शरद अहिरेप्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, सहसचिव भा.र. गावित तसेच गुणवंत विद्यार्थी पालक वर्ग व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट आयोजनासंबंधित पालक व विद्यार्थ्यांनी विशेष प्रशंसोद्गार काढले.

ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथाची यादी जाहीर

मुंबई - ग्रंथभेट येाजनेअंतर्गत सन २०१५ मधील प्रकाशित ग्रंथाची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी राज्य शासनाच्या आणि ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.राजा राममोहन राँय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून ४२व्या ग्रंथभेट योजनेतर्गत सन २०१५ मध्ये प्रकाशित ग्रंथाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीने निवड केलेल्या ८५५ ग्रंथांमध्ये   ६१० मराठी,  १३५ हिंदी व ११० इंग्रजी भाषेतील ग्रंथांचा या यादीत समावेश आहे. वाचकांच्या माहितीसाठी २७ सप्टेंबर २०१७ ते १६ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि ग्रंथाlलय संचालनालयाच्या www.dot.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही यादी ठेवण्यात येणार आहे.

ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबद्दल काही सूचनाहरकतीआक्षेप तसेच ग्रंथाचे नावलेखकप्रकाशक आणि किंमत यामध्ये काही बदल असल्यास १६ ऑक्टोबर २०१७ पर्यंतचा ग्रंथालय संचालनालयास कळविण्यास यावे. आपल्या सूचना किंवा हरकती किंवा अपेक्षित बदल यासाठी संबंधितांनी  लेखी स्वरुपातटपालाने अथवा www.dot.maharashtra.gov.in या ई-मेलवर ग्रंथालय संचालकग्रंथालय संचालनालयमहाराष्ट्र राज्यनगर भवनमुंबई-२३ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.

कुमार कदम यांचा ब्लॉग..