इतर बातम्या

दु:खितांसाठीच्या सेवाकार्यातून 'कृतार्थ' झाल्याची भावना : कमल भावे

मुरुड (ता.दापोली, जि.रत्नागिरी) : दु:खात होरपळणाऱ्या जगभरातील शेकडो कुटुंबाना, 'मी ज्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात झालेला बदल, त्यांना मिळालेले समाधान, यातच मला मी कृतार्थ झाल्यासारखे वाटते.' अशा भावना, भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे, रँग्लर अप्पासाहेब परांजपे, पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे आदि दिग्गजांचे सततचे मार्गदर्शन आणि सहवास लाभलेल्या, दापोली तालुक्यातील मुरूड़ गावच्या प्रसिद्ध समाजसेविका, मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधील निवृत्त मेडिकल सोशल वर्कर सौ. कमल श्रीकांत भावे यांनी त्यांची जीवनकथा असलेल्या 'कृतार्थीनी' ग्रंथ प्रकाशन सोहोळ्याप्रसंगी व्यक्त केल्या.

मुरूड, तालुका दापोली मधील महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित न. का. वराड़कर हायस्कूलच्या सभागृहात, गांधी जयंती आणि ''स्वर्गीय न. का. वराडकर" यांच्या ४० व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या या सोहोळ्याला व्यासपीठावर महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून नायर हॉस्पिटल मुंबईचे निवृत्त समाजसेवा विभाग प्रमुख भागवत हरी पाटील, कोकणचे नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर, पंचायत समिती सभापती बैकर, लेखिका प्रा.शांता सहस्रबुद्धे, 'उखाणेकर' मीनल गुजर, 'कृतार्थीनी'चे लेखक धीरज वाटेकर, श्रीकांत भावे, संस्थेचे विश्वस्त विश्वनाथ वराडकर, रमेश तळवटकर, मुरुडचे सरपंच सुरेश तुपे, शाळेच्या मुख्याध्यापिका मधुमालती गारडे उपस्थित होत्या.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक एस. परसुरामन, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि नाटककार 'पद्मभूषण' सई परांजपे, देशातील विख्यात शल्यचिकित्सक डॉ. व्ही. एन. श्रीखंडे आदि मान्यवरांच्या संदेशाचे वाचन शिक्षक गमरे यांनी केले. पुस्तकाला प्रस्तावना देणाऱ्या, प्रख्यात मानसोपचार व मनोविकारतज्‍ज्ञ, मराठीतील जवळपास प्रकाशित २५ पुस्तकांचे लेखक-साहित्यिक डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान गौरी खटावकर, माधवी मुकादम, देवेंद्र जाधव, निवृत्त मुख्याध्यापिका वैशंपायन यांनी 'कमल भावे' यांच्या योगदानाबाबत आपले उस्फूर्त अनुभव कथन केले. कमल भावे यांना, त्यांच्या गुरू शकुंतलाबाई यांनी दिनांक १४ नोव्हेंबर १९७३ रोजी, वाढदिनी भेट दिलेला, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांची दुर्मीळ छबी असलेला फोटो या कार्यक्रमात, सौ.भावे यांनी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेस भेट दिला, तो अध्यक्षा सौ. सुहासिनी मोरे यांनी स्वीकारला.

यावेळी बोलताना भागवत हरी पाटील यांनी कमलताई या आपल्या 'गुरु' असल्याचे नमूद केले. प्रा. शांता सहस्रबुद्धे यांनी आपल्या आणि कमल भावे यांच्या शालेय जीवनापासूनच्या आठवणी सांगून, हा ग्रंथ तयार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मीनल गुजर यांनी आपल्या भावना काव्यातून व्यक्त केल्या. रमेश तळवटकर यांनी महर्षी कर्वे शिक्षण संस्था आणि कमल भावे यांचे योगदान याविषयी माहिती सांगितली. 'कृतार्थीनी'चे लेखक धीरज वाटेकर यांनी 'सामाजिक कार्यकर्ता' आणि 'समाजसेवा' या शब्दांचा निश्चित अर्थ आणि कामाची पद्धत समजून घेण्यासाठी तरुणाईने हा चरित्रग्रंथ आवर्जून वाचावा, असे नमूद केले. अण्णा शिरगावकर यांनी कमल भावे आणि श्रीकांत भावे या दोघांचा आपल्या भाषणात सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका गारडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

चिपळूणच्या १५० वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्राच्या ग्रंथालय चळवळीतील अग्रणी, साहित्यिक प्रकाश देशपांडे, कवि अरुण इंगवले, नाट्यलेखक प्रा.संतोष गोणबरे, साहित्यिक मच्छिंद्रनाथ वाटेकर, सुभाष साटले, विवेक भावे, प्रवीण वाटेकर यावेळी उपस्थित होते. प्रकाश देशपांडे यांनी कमल भावे यांना, अण्णासाहेब कर्वे यांच्या १०० वर्षपूर्ती सोहोळ्यात त्यांनी केलेले भाषण प्रकाशित झालेल्या 'चंद्रोदय' या चिपळूणातून प्रकाशित झालेल्या दुर्मीळ अंकाची प्रत भेट दिली. सोहोळ्याचे सूत्रसंचालन राजेश नरवणकर यांनी तर आभार संजय भावे यांनी मानले. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल पेढे, चिपळूण येथील सौ. नूतन विलास महाड़िक यांच्या 'निसर्ग प्रकाशन'चे आभार मानण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित सुमारे १२५ मान्यवरांना कृतार्थीनी हा ग्रंथ भेट देण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी केली रायलादेवी तलावाची स्वच्छता

ठाणे -  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज,सोमवारी स्वच्छता अभियानांतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव स्वच्छ करण्यात आला. सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत पालकमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदेशिवसेनेचे विविध नगरसेवकपदाधिकारी आणि शिवसैनिकांनी श्रमदान करून संपूर्ण रायलादेवी तलाव आणि परिसर स्वच्छ केला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सेवकांनीही या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नुकताच पार पडलेला गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलावात निर्माल्य आणि प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा झाला होता. हा संपूर्ण कचरा काढण्यात आल्यामुळे तलाव आणि परिसर स्वच्छ झाला.

स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने पालकमंत्री शिंदेखासदार डॉ. शिंदेमहापौर आणि सर्व शिवसैनिकांनी अडीच तास श्रमदान करून तलावाचा कोपरा अन कोपरा स्वच्छ केला. संपूर्ण तलावाला फेरी मरून सर्व किनारे आणि पाण्यात पडलेले निर्माल्य आणि प्लॅस्टिकचा कचरा बाहेर काढण्यात आला.

स्वच्छता ही सार्वजनिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब असून हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता लोकांनी स्वच्छतेची सवय अंगी बाणवण्याची गरज आहेअसे शिंदे याप्रसंगी म्हणाले.

रेल्वेभची कामे वेळेत पुर्ण करण्यानसाठी मुंबई भाजपची “पाठपुरावा समिती” गठीत

मुंबई - परळ-एल्फिन्स्ट रोड पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्‍वे मंत्र्यांनी सलग दोन दिवस पंधरातास मॅरेथॉन बैठक घेऊन सुचव‍लेल्‍या उपाययोजनांचा कालबध्‍द पध्‍दतीने पाठपुरवा करण्‍यासाठी आज मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड.आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली चार सदस्यीय पाठपुरावा समिती गठीत करण्‍यात आली आहे. आज झालेल्‍या मुंबई भाजपच्‍या कार्यकारणी बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला असून यावेळी या दुर्घटनेतील मृतांना भाजपतर्फे श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली.

मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड.आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दादर वसंत स्‍मृती कार्यालयात मुंबई भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई पदाधिकाऱ्यांसह राज्‍याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्‍यमंत्री विद्या ठाकूर ही उपस्थित होत्‍या. पक्षाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठकीनंतर त्‍या बैठकीत देण्‍यात आलेल्‍या सुचना मुंबई पदाधिकरी आणि वॉर्ड अध्‍यक्षांपर्यंत पोहचविण्‍यासाठी व संघटनात्‍मक कामांचा आढावा घेण्‍यासाठी ही बैठक घेण्‍यात आली. यावेळी संघटन मंत्री सुनिल कर्जतकर यांनी पक्षाने नियुक्‍त केलेले विस्‍तारक आणि त्‍यांनी घेतल्‍या बैठका यांचा आढावा घेतला तसेच बुथ पातळीवर दहा सदस्यांची कमीटी गठीत करण्‍यात येणार असून याही योजनेचा आढावा घेण्‍यात आला.

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी आपल्‍या भाषणात राष्‍ट्रीय कार्यकारणीमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शाह यांनी केलेल्‍या सूचना तसेच मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे यांनी वॉररुमधून दिलेल्‍या संघटनात्‍क कामाची रुपरेषा, राज्‍य सरकारची कामे व सूचना याचा सविस्‍तर उहापोह या बैठकीत केला. पक्षाच्‍या विस्‍तार योजना व दोन्‍ही सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जाताना पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे याबाबतही त्‍यांनी मार्गदर्शन केले. तर सरकार आणि पक्षावर समाजमाध्‍यमांतून होणारी टीका त्‍यावर पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी काय उत्तर द्यावे याबाबतही त्‍यांनी आपल्‍या भाषणात मार्गदर्शन केले.

या बैठकीत नगरसेविका शैलजा गिरकर तसेच राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्‍येष्‍ठ सदस्य दादा गावकर यांच्‍यासह परळ-एल्फिन्स्ट रोड रेल्‍वे पुलावरील दुर्घटनेमध्‍ये मृत्‍यू झालेल्‍या मुंबईकरांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली.

परळ-एल्फिन्स्ट रोड पुलावरील घटनेनंतर रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई रेल्‍वेच्‍या सेवांचा दर्जा सुधारण्‍यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये १५ महिन्‍यात सर्व लोकलमध्‍ये सीसीटीव्‍हीमध्‍य रेल्‍वेच्‍या २० व पश्चिम रेल्‍वेच्‍या १३ पादचारी पुलांचा विस्‍तार, १० नविन पादचारी पुल, गर्दीच्‍या स्‍थानकावर सरकते जिने आदी उपाय योजनांसह मुख्‍यालयात ठाण मांडून बसलेल्‍या २०० अधिकाऱ्यांना फिल्‍डवर काम करण्‍याची सक्‍ती करण्‍यात आली आहे. ही कामे कालबध्‍द पध्‍दतीने पुर्ण व्‍हावीत म्‍हणून भाजपाने पक्षाची एक पाठपुरावा समिती घोषीत करण्‍याचा निर्णय आजच्‍या बैठकीत घेतला. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही समिती तयार करण्‍यात आली असून यामध्‍ये आमदार भाई गिरकर, माजी आमदार मधू चव्‍हाण, नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचा समावेश आहे.

याबाबत बोलताना आमदार अॅड.शेलार म्‍हणाले की, ही समिती रेल्‍वे मंत्र्यांनी सूचवलेल्‍या कामांचा पाठपुरावा करणार आहे. तसेच रेल्‍वेचे प्रशासकीय अधिकारी यांना जाब विचारून सदर कामे वेळेत पुर्ण होत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्‍याचे काम करेल.

स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राची पावले मैलाचा दगड : राष्ट्रपती

मुंबई - स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने टाकलेली पावले मैलाचा दगड ठरत आहेतअसे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या नागरी भागाच्या हागणदारी मुक्ती बाबतच्या ‘संकल्प पुर्ती’ कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद,  राज्यपाल चे. विद्यासागर राव,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेपाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर,  नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटीलग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसेपाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद यांनी प्रथमतः मुंबईत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. मुंबईवासी नेहमीच अपल्यासमोरील आव्हानांना सामोरे जात पुढे जात असतात. या शब्दात त्यांनी मुंबईकरांचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्रातील सर्व शहरी भाग उघड्यावरील हागणदारी मुक्त झाल्याबद्दल राज्याचे अभिनंदन करुन राष्ट्रपती पुढे म्हणाले की२०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ भारत होण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान कौतुकास्पद आहेराज्याने नागरी भाग स्वच्छ केला आहेयासाठी सर्व नागरी संस्थांचे पदाधिकारीअधिकारीराज्याचे अधिकारी कौतुकास पात्र आहेतस्वच्छ महाराष्ट्र अभियानातील टीम मधील सहभागी घटकांसह या कामात काम करणारे स्वच्छता कामगार विशेष कौतुकास पात्र आहेत. राज्याने ३१ मार्च २०१९ पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केल्याचे समजून आनंद वाटलाया माध्यमातून राज्याने महात्मा गांधींजींना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती पुढे म्हणाले कीग्रामीण भागात महिला व युवतींनी शौचालय बांधण्यासाठी कुटुंबांची मानसिकता घडविल्याने परिवर्तन झाले आहेमहिला व मुलींनी पुढाकार घेतल्याने मोठ्या प्रमाणात शौचालयांची निर्मिती झाली आहेमुली देखील लग्न करुन जाणाऱ्या घरात शौचालय आहे का हे आधी पाहतात, त्यामुळे स्वच्छतेच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे स्वच्छ भारतासाठी मोफत करत असलेल्या जाहिरातींचा उल्लेख करुन त्यांचेही कार्य मोठे आहे असे सांगून राष्ट्रपती म्हणाले कीबच्चन यांच्या जाहिरातींमुळे देशभरात लाखोकरोडोंच्या संख्येत कुटुंबांना शौचालये बांधण्याची प्रेरणा मिळालीदेशातील स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद आहेचमात्रते शाश्वत असायला हवेस्वच्छ वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालयांचा वापर केल्यानंतर पुन्हा ती स्वच्छ असतील यासाठी मानसिकता तयार केली पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

केवळ लक्ष गाठण्याच्या बाबीस प्राधान्य न देता स्वच्छतेचे कार्य निरंतर होत राहील याकडेही लक्ष दिले पाहिजेउघड्यावरील शौचामुळे देशाचे होणारे आर्थिक नुकसान हे देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या (जीडीपी) . टक्क्यापर्यंत होतेआजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेचे काम महत्त्त्वपूर्ण आहेस्वच्छतेसाठी काम करणे ही खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा आहेओपन डिफेकेशन फ्री (ओडीएफच्या अंतर्गत राज्याकडून ओडीएफ वॉच पद्धतीने ठेवले जाणारे लक्ष लोकांना आपल्या जुन्या सवयी सोडणे आणि मानसिकता बदलण्यास भाग पाडण्यास उपयोगी ठरतील.

महाराष्ट्राची सुमारे ४९ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहतेही बाब लक्षात घेता अर्धा महाराष्ट्र आज हागणदारी मुक्त झाला आहेयाबरोबरच आगामी काळात शहरांबरोबरच पूर्ण राज्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था होईलअसा विश्वास आहेदेशामध्ये स्मार्ट सिटीज प्रमाणेच स्मार्ट सॅनीटेशन आणि स्मार्ट वेस्‍ट मॅनेजमेंट यावरही काम होण्याची गरज आहेअसेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले कीराज्यातील नागरी भाग ओडीएफ जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने तीन स्तरावर काम केलेशहरांनी ओडीएफ जाहीर केल्यानंतर विभागीय स्तरावर आणि त्यानंतर राज्य शासनाच्या पातळीवर तपासणी करण्यात आलीत्यानंतर केंद्राच्या पथकानेही त्याची तपासणी केलीओडीएफ जाहीर करण्यासाठी लोकांची मानसिकता तसेच सवयी बदलण्याची गरज आहेत्यादृष्टीने राज्य शासनाने ओडीएफ वॉच सुरु केलेगुड मॉर्निंगगुड इव्हीनींग पथके स्थापन करुन या कामाला पुढे नेलेहे काम इतक्यावरच न थांबता आगामी  महिन्यात लोकांनी शौचालयांचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून प्रोत्साहित केले जाईल, जेणेकरुन या कामात सातत्य राहील.

राज्याने गेल्या दोन वर्षात ४० लाख शौचालयांची निर्मिती केलीहा कार्यक्रम शासनाचा नाही तर लोकचळवळ ठरला असल्याने यशस्वी ठरला आहेयेत्या ३१ मार्च २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करुन प्रधानमंत्र्यांनी पाहिलेले संपूर्ण हागणदारी मुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम राज्य शासन करेल.

राज्य शासन कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रकिया करण्यासाठी प्रयत्न करत आहेतसेच संपूर्ण सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन कंपोस्ट तयार करुन ‘महासिटी’ हा एक ब्रॅण्ड महाराष्ट्राने तयार केला आहेहे कंपोस्ट खत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतीची उत्पादकताही वाढत आहेअसेही ते म्हणाले.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीआज महाराष्ट्रात ९९ टक्के शौचालयांचे बांधकाम झाले आहे. हागणदारी मुक्तीसाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न केले. १५ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांनाही स्वच्छतेची शपथ दिली जाते. त्यामुळे मुलांच्या माध्यमातून घरोघरी प्रबोधन होते. स्वच्छतेमुळे आरोग्यदायी पिढी तयार होईलया स्वच्छतेबरोबरच राज्य शासनाच्या सर्व विभागातील झिरो पेंडन्सीचे काम म्हणजेच शासकीय कामकाजातील स्वच्छतेसाठीही शासन प्रयत्न करत आहेतअसे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की,आजचा निर्धार हा संकल्प ते सिद्धीचा आहे.मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व नागरी संस्थांनी मेहनत घेतल्यामुळेच हे शक्य झालेआता १७ सप्टेंबर २०१९ पर्यंत शहरांतील संपूर्ण सांडपाणी प्रकिया तसेच कचरा विलगीकरण केले जाईलअसेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केलीराष्ट्रपती आणि राज्यपालांना स्मृतिचिन्ह देण्यात आलेराज्यामार्फत ओडीएफ साठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबाबतची पुस्तिकाही यावेळी प्रकाशित करण्यात आली.ओडीएफबाबत प्रधानमंत्री यांचा संदेश तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने केल्या प्रयत्नांची चित्रफीतग्रामीण भागातील ओडीएफ कामाची चित्रफीतही दाखवण्यात आली.

या कार्यक्रमात महाराष्ट्राचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. राज्यातील २७ महानगरपालिका हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व महापौरनगरसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल राज्यातील महानगरपालिकांचे महापौर आणि नगरसेवकांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात नगरपरिषद महासंघाचे अध्यक्ष हिंगणघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी सत्कार स्व‍िकारला.

महाराष्ट्राचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी मुख्य सचिवप्रधान सचिव (नगर विकास-२), सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्तनगरविकास विभागातील सर्व अधिकारीनागरी प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्या वतीने मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सत्कार स्वीकारला.

राज्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी संघटनेचे अध्यक्ष व नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुखमुख्याधिकारी संघटनेचे सचिव व हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटीलस्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे संचालक उदय टेकाळे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्थांतील सफाई कामगारांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात उमरेड नगरपरिषदेचे दिलीप चव्हाणचोपडा नगरपरिषदेचे कैलास चोरेअकोला महानगरपालिकेचे अशोक गोहर, नागपूर महानगरपालिकेचे अशोक मलिकराजुरा नगरपरिषदेच्या श्रीमती भानुबाई कळवाले यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सेंटर फॉर एन्वायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी (सीईपीटी)अहमदाबादरेक्किट बेनकिसर (आरबी) आणि जर्मन इंटरनॅशनल कार्पोरेशन (जीआयझेड) या संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल सीईपीटीचे प्रोफेसर इमिरेट्स दिनेश मेहता आणि श्रीमती मीरा मेहताजीआयझेडचे प्रकल्प संकलक डर्क वॉल्टरघन कचरा व्यवस्थापनचे तांत्रिक तज्ज्ञ जितेंद्र यादवरेक्किट बेनकीसर साऊथ इस्ट एशियाचे एसव्हीपी रिजनल डायरेक्टर नितीश कपूररेक्किट बेनकीसर साऊथ इस्ट एशियाचे एक्सटर्नल अफेअर्स अँड पार्टनरशिप हेड रवी भटनागर यांचा सत्कार करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१६-१७ अंतर्गत ग्रामपंचायतींचे विभागस्तरीय पुरस्कारही देण्यात आले. यामध्ये पाटण (जि. सातारा) मधील मान्याची वाडीचे रवींद्र माने (सरपंच) व प्रसाद  यादव (ग्रामसेवक), रोहा (रायगड) तालुक्यातील धाटावचे विनोद पशिलकर (सरपंच) व दीपक चिपळूणकर (ग्रामसेवक)अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारचे पोपटराव पवार (सरपंच) व सचिन थोरात (ग्रामसेवक)अनंतपाळ (लातूर) मधील धामणगाव शिरुळ चे धनंजय पाटील (सरपंच) व हुदगे जी.एस. (ग्रामसेवक)मेहकर (बुलढाणा) मधील पांगारखेडच्या अंजली सुर्वे (सरपंच) व मोहन वानखेडे (ग्रामसेवक) आणि लाखणी (जि. भंडारा) येथील शिवणी (मो) च्या माया कुथे (सरपंच) व जयंत गडपायले (ग्रामसेवक) यांचा सत्कार करण्यात आला.

कुमार कदम यांचा ब्लॉग..