इतर बातम्या

जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे : डॉ. रणजीत पाटील

अकोला - जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहेवाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणीसमस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजेवाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजेअसे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

अकोला येथील सिव्हील लाईन परिसरातील श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य (एल.आर.टी.) महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्तीसंत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटेग्रंथमित्र प्रा.डॉ. एस.आर.बाहेतीप्राचार्य डॉ.श्रीप्रभू चापकेशिक्षणाधिकारी (माध्य) प्रकाश मुकुंदजिल्हा ग्रंथालय संस्थांचे अध्यक्ष शामराव वाहुरवाघअमरावतीचे सहाय्यक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृती पुढे नेण्यासाठी आज पुस्तकांबरोबरच ई-लायब्ररी उपलब्ध आहे. त्यामुळे माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेअसे सांगून पालकमंत्री म्हणाले कीवाचन संस्कृती वाढविण्यात सार्वजनिक वाचनालयाचा मोठा वाटा आहेअशी वाचनालय वाढणे अत्यंत गरजेची आहे. या वाचनालयांना येणाऱ्या अडचणीसमस्या सोडवण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.

पालकमंत्री म्हणाले कीवाचनातून मिळालेले ज्ञान इतरांनाही दिले गेले पाहिजेजेणेकरून पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईलयासाठी पालकमंत्री यांनी स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी केलेल्या ज्ञानदानाचे उदाहरण यावेळी दिले. तसेच आपला मित्र वाचनामुळे कसा आयएएस झाला याबाबतची माहिती दिली.

यावेळी श्री. बाहेती यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल दिपक गेडाम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गोपाल सुरे यांनी तर आभार प्रदर्शन नवल कवडे यांनी केले. यानंतर ग्रंथोत्सवानिमित्य आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापून पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिक स्टॉलला भेट दिली.

ग्रंथोत्सवानिमित्त सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथदिंडीत महिला वारकऱ्यांसोबतच विद्यार्थीनागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेली दिंडी अकोलावासियांसाठी आकर्षण ठरली.

विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल : विनोद तावडे

मुंबई - दहावी आणि बारावीची परीक्षा ही विदयार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विदयार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे. या परीक्षेदरम्यान अर्ध्या तासात विदयार्थ्यांचे हॉलतिकीट तपासणे, प्रश्नपत्रिका देणे असे करणे शक्य होणार असल्याने अर्धा तास अगोदर वर्गात सोडून ११ वाजता परीक्षा सुरु करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी आणि बारावीच्या विदयार्थ्यांना ११ नंतर म्हणजेच साधारण ३१ मिनिटांनी उशिरा आल्यावर परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षागृहात प्रवेश करताना विदयार्थ्यांचा गोंधळ होऊ नये आणि विदयार्थ्यांना तणावमुक्त पध्दतीने परीक्षा देता यावी यासाठी  परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीतसुध्दा विदयार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच प्राधान्य देण्यात येईल, एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असेही तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सहा महिन्यात प्लॅस्टिकवर बंदी : मुख्यमंत्री

मुंबई - येत्या सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणूनपर्यायी व्यवस्था करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.आज राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेवातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सहभाग फार महत्वाचा आहे. समुद्रातील प्रदुषित पाण्यामुळे अरबी समुद्र किनारा प्रदुषित होत आहे. यावर उपाय करण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणार असून त्यासाठी पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. लवकरच पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या मिळणार आहेत. तीन-चार वर्षात हा प्रकल्प पुर्ण होईल. प्रदुषित पाणी समुद्रात सोडेलेले आढळणार नाही.

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. परंतु काही नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने काम रखडत आहे. मेट्रोचे काम दिवसा करावेरात्री करु नयेधुळीचा त्रास होतोइमारतींना तडे जातात असे काही मुद्दे आहेत. जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे. मेट्रोमुळे दळणवळणाला गती येणार आहे. काम रखडत गेले तर कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. एकीकडे देशातील अनेक नद्या प्रदुषित आहेत. महाराष्ट्रात मात्र नदी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात 11 हजार गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली आहेत. दुष्काळावर त्यांनी मात केली आहे. यामध्ये लोकांचा सहभाग महत्वाचा होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र अग्रेसर आहे. घराघरात आणि शहरात महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवीन पीढी पर्यावरण विषयक बाबीमध्ये अत्यंत जागरुक आहे. स्वच्छता अभियानात त्यांचा पुढाकार वाढत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी सरकार कसोशिने प्रयत्न करीत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणालेमुंबईतील हवेत असलेले कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यासाठी विविध उपाय केले आहेत. राज्यातील 40 नद्या स्वच्छ केल्या आहेत. कारखान्यातील प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक उपाय करीत आहोत. पर्यावरणाचे संतुलन कायम रहावे म्हणून लाखो झाडे लावण्याची मोहीम सरकारने पार पाडली आहे. प्लॅस्टिक कॅरिबॅग बंदीसाठी पर्यावरण विभाग वेगाने काम करीत आहे.

मुख्य सचिव सुमित मल्लिक म्हणालेजगभर पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. राज्य शासन पर्यावरणाच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत असून जनतेलाही सहभागी करुन घेत आहे.

 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ.डी.वाय चंद्रचूड म्हणालेस्वच्छ भारत मिशन हा महत्वाचा कार्यक्रम असून त्यात जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. प्रदुषण हटाव मोहिमेकडे एक सामाजिक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. शहरातील कचरा उचलण्याचे नियोजन हवे. प्लॅस्टिकच्या वस्तूकॅरिबॅग वापरण्यावर बंदी पाहिजे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदुषणकचऱ्याची विल्हेवाट लावणेप्रदुषित पाणी याबाबतच्या तक्रारी ऑनलाईन स्विकारल्या पाहिजेत. पर्यावरण बचाव मोहिमेसाठी प्रत्येक सरकारनेखासगी संस्थास्थानिक स्वराज्य संस्था यांनी निधी राखून ठेवला पाहिजे. प्लॅस्टिकच्या वस्तुंचे रिसायकलिंग केले पाहिजे. सोलर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर म्हणाल्याएकीकडे विकासाच्या मागे लागत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. सुनामीध्वनी प्रदुषणपाणी प्रदुषण मानवाला घातक आहे. ग्लोबल वॉर्मिंगप्लॅस्टिक वापराचा धोका आहे. प्रदुषणाच्या बाबतीत प्रचार आणि प्रसार गरजेचे आहे. प्रदुषणाच्या तक्रारी थेट प्रदुषण नियंत्रण बोर्डाकडे केल्या पाहिजेत.

राष्ट्रीय हरित लवादाचे चेअरमन न्या.स्वतंत्रकुमार म्हणालेस्वच्छ भारत हे आपले व्हिजन आहे. त्यादृष्टिने सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. पर्यावरणाचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे जागृत रहाणे गरजेचे आहे. समुद्र किनारेरस्ते स्वच्छ करण्याची जबाबदारी एकट्या सरकारची नाही. जनतेने यात सहभाग नोंदवला पाहिजे.

प्रारंभी राष्ट्रीय हरित लवादाचे चेअरमन न्या.स्वतंत्रकुमार यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरण राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.  शेवटी गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी आभार मानले.

मुंबईतील मिठी नदी लगतची २७० पेक्षा अधिक बांधकामे तोडली

मुंबई - मिठी नदी पात्राजवळील २७० पेक्षा अधिक बांधकामे महापालिकेच्या 'के पूर्वविभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत. 'परिमंडळ ३चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे सदर परिसरात मिठी नदीची संरक्षक भिंत बांधण्यास मदत होणार आहेतसेच या कारवाईमुळे मोकळ्या झालेल्या भागात सेवा मार्गिका (Service Road) बांधणे शक्य होणार असून ज्यामुळे भविष्यात मिठी नदीतील गाळ साफ करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती यंत्रसामुग्री नदीपात्रात उतरविणे सुलभ होणार आहेपरिणामी पावसाळ्याच्या काळात नदीतील पाण्याचा निचरा अधिक जलद होण्यासही मदत होणार आहेतसेच या परिसरात जागा उपलब्ध झाल्याने 'मलजल प्रक्रिया केंद्रउभारणेपरिसराचे सौंदर्यीकरण करण्यासह नागरी सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे सुलभ होणार आहेअशी माहिती 'के पूर्वविभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.

मिठी नदीच्या पात्राजवळ उद्भवलेली २७० बांधकामे / अतिक्रमणे ही हटविण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभलेसाधारणपणे ५५ पोलीस कर्मचा-यांचा ताफा या कारवाई दरम्यान घटनास्थळी उपस्थित होतातर महापालिकेचे सुमारे ६२ कामगारकर्मचारी - अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.या कारवाईसाठी ३ जेसीबी२ पोकलेन यासह इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आलीया ठिकाणच्या पात्र धारकांना प्रकल्प बाधीतांसाठीच्या (PAP) निवास व्यवस्थेच्या वाटपाबाबत कार्यवाही देखील सुरु करण्यात आली आहेया कारवाईमुळे 'के पूर्वविभाग क्षेत्रातील मिठी नदी पात्राजवळील बांधकामे / अतिक्रमणे हटविण्याचे काम आता पूर्ण झाले आहेअशीही माहिती सहाय्यक आयुक्त जैन यांनी दिली आहे.

कुमार कदम यांचा ब्लॉग..