इतर बातम्या

‬गानसम्राज्ञी लता मगेशकर पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

मुंबई   - राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात सन्मानाचा दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा श्रीमती पुष्पा पागधरे यांना दि.२६ नोव्हेंबर रोजी यशवंत नाटय मंदिर,माटूंगा येथे सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोखमानपत्र,सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली होती. यापूर्वी हे पुरस्कार श्रीमती माणिक वर्माश्रीनिवास खळेगजानन वाटवेदत्ता डावजेकरपं.जितेंद्र अभिषेकीपं.हदयनाथ मंगेशकरज्योत्सना भोळे,  आशा भोसलेअनिल विश्वाससुधीर फडकेप्यारेलाल शर्मा,रवींद्र जैनस्नेहल भाटकरमन्ना डेजयमाला शिलेदार,  खय्याममहेंद्र कपूरसुमन कल्याणपूरसुलोचना चव्हाणयशवंत देवआनंदजी शहाअशोक पत्कीकृष्णा कल्लेप्रभाकर जोगउत्तम ब्रिदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडेमुंबईचे पालकमंत्रीसुभाष देसाईमहापौरविश्वनाथ महाडेश्वरखासदार  राहूल शेवाळेआमदार हेमंत टकले आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त विजेते  उत्तम सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार पागधरे यांना प्रदान केला जाणार आहे.

पुष्पा पागधरे यांचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झालासंगीताचे धडे लहानपणी त्यांचे वडील जनार्दन चामरे यांच्याकडून मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु आर.डी.बेन्द्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीत आणि राग रागीनी यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत्‍ येऊन गीतगझलभजन आणि ठूमरी हे सुगम संगीत घेण्यास सुरवात केली. पागधरे आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. प्रसिदध संगीतकार राम कदम यांनी त्यांना प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटात गायनाची संधी दिली. बाळ पळसुलेसुधीर फडकेश्रीनिवास खळेप्रभाकर पंडितडी.एस.रुबेनविठठल शिंदेराम-लक्ष्मणविश्वनाथ मोरेयशवंत देव इत्यादी अनेक प्रसिदध संगीतकारांच्या चित्रपटांमध्ये त्यांना गायनाची संधी मिळाली.

त्यांना दोन वेळा शासनाच्या पुरस्कार सोहळयात पार्श्वगायिकेची पारितोषिके मिळाली आहेत. त्यांनी खुन का बदलाबिना माँ के बच्चेमुकददर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठीभोजपुरीओडियाबंगाली,मारवाडीहरियानवीपंजाबीगुजराती आणि आसामी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

या पुरस्काराबरोबर ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आदित्य्‍ बिलवकर यांनी सादर केली असून राहूल सक्सेनामुग्धा वैशपायनमधुरा कुंभारजयदीप बगवाडकरमाधुरी करमरकर हे गायक असून सागर टेमघरेअमित गोठीवरेकरअमोघ दांडेकरआशुतोष दांडगेदिनेश भोसलेवरद काठापूरकरमहेश खानोलकरकृष्णा मुसळेहनुमंत रावडे,विवेक भगतसिदधार्थ कदम व विजय जाधव हे वादक कलाकार आहेत. कोरस नितीन करंदीकर आणि समूह हे करणार असून विघ्नेश जोशी निवेदन करणार असून विनायक चव्हाण हे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. पुरस्कारार्थीचा सन्मानार्थ रसिंक प्रेक्षकांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, संजय कृष्णाजी पाटील यांनी केले आहे.

मुंबईतील मालाड मार्वे येथील रो रो जेट्टी सेवेचे रविवारी भूमीपूजन

मुंबई - मुंबईमधील मालाड-बोरिवली येथील व्यावसायिक, नोकरदार, मच्छिमार बांधवांना सुलभ व जलद वाहतुकीसाठी मालाड-मार्वे येथे रो रो जेट्टीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवार १९ नोव्हेंबर रोजी शिक्षणमंत्री व मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

मालाड मार्वे येथे सायंकाळी ४.०० वाजता आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्यमंत्री डॅा. दीपक सावंत, महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, मुंबई मनपाचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अस्लम शेख, नगरसेविका स्टेफी केणी, महाराष्ट़ मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, जिल्हाधिकारी दीपेन्द्र कुशवाह आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

मच्छीमारांना पॅसेंजर बोटी उपलब्ध नाहीत, त्यांना वाळूतून जावे लागते, आजारी व्यक्तींची गैरसोय होते, म्हणून रो रो जेट्टी सुरु करण्यात येत आहे. यापूर्वी मनोरी गावातून मालाड येथे पोहचण्यासाठी गोराई, उत्तन, भाईंदर या रस्त्याच्या मार्गे पोहचावे लागत असे. या सुमारे ३७ किलोमीटरच्या प्रवासाला सुमारे २ तासांचा अवधी लागायचा मात्र रो रो जेट्टी मुळे या प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. मनोरी, गोराई, उत्तन भाईंदर येथे चारचाकी वाहनांना जाण्याकरीता सुविधा उपलब्ध होणार आहे. 

राज्यात रविवारपासून कौमी एकता सप्ताह साजरा होणार

मुंबई - केंद्र शासनाने सन १९८६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार रविवार दि. १९ नोव्हेंबर ते शुक्रवार २५ नोव्हेंबर हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. कौमी एकता सप्ताहाच्या निमित्ताने रविवार दि. १९ नोव्हेंबर  रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात येणार आहे. धर्मनिरपेक्षताजातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणारे सभाचर्चासत्रे आणि परिसंवाद या निमित्ताने राज्यभरात आयोजित करण्यात येतील. सोमवारी २० नोव्हेंबर  रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा करण्यात येणार असून यादिवशी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमावर भर देण्यात येणार आहे. मंगळवार, दि. २१ नोव्हेंबर  या  दिवशी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारसाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने विशेष वाड:मयीन कार्यक्रम आणि कवी संमेलने आयोजित करण्यात येतील. बुधवारी दि. २२ नोव्हेंबर  रोजी दुर्बल घटक दिवस असून २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम यावेळी करण्यात येतील. गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर हा दिवस सांस्कृतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. या दिवशी भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येईल. या दिवशी भारतीय समाजातील महिलांचे महत्व आणि राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देण्यात येईल. शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी जोपासना दिवस साजरा करण्यात येणार असून पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

सदर दिवशी कार्यक्रमाची रुपरेषा लक्षात घेऊन ध्वजारोहणमिरवणूका व सभाराष्ट्रीय एकात्मतेची शपथ चर्चासंमेलने चित्रपट दाखविणे व प्रदर्शने अश्या माध्यमांचा उपयोग केला जाईल. दि. १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ राज्यातील सर्व केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या कार्यालयातून घेण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७१११५१५४०५७८५१४ असा आहे.

सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी आता ‘महाडीबीटी’

मुंबई -  सन २०१७-१८ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी (https://mahadbt.gov.inकार्यान्वित करण्यात आले आहे.शालेय शिक्षण विभागाच्‍या माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण संचालनालयामार्फत  राबविण्‍यात येणाऱ्या  उच्‍च प्राथमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा (इ.  वी) व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा ( इ.  वी )कनिष्‍ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांना देण्‍यात येणारी  शासकीय खुली गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती आर्थिकदृष्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्‍याना राज्‍य शासनाची खुली गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती व संस्‍कृत शिक्षण माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांना भारत सरकारच्‍या शिष्‍यवृत्‍ती विषयक योजनांसाठी आता राज्‍य शासनाकडून नव्‍याने महाडीबीटी (MAHADBT) पोर्टल सुरु करण्‍यात आले आहे.  या पोर्टलच्या माध्यमातून आता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. महाडीबीटी पोर्टलचा शाळा आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा  होणार आहे.

विदयार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. अर्ज ऑनलाईन असल्याने विदयार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्‍यात  गुणवंत विद्यार्थ्‍याना प्रोत्‍साहन  देण्‍यासाठी  महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषदेमार्फत घेण्‍यात येत असलेल्‍या स्‍पर्धात्‍मक परीक्षांच्‍या निकालावर प्रामुख्‍याने  गुणवत्‍तेनुसार उच्‍च प्राथमिक (इ.  वी)  व माध्‍यमिक (इ.  वी)  शाळांतील  विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍या  दिल्‍या जातात. ही शिष्‍यवृत्‍ती  विद्यार्थ्‍याची समाधानकारक प्रगती व चांगल्‍या वर्तणुकीच्‍या आधारे पुढे चालू राहते. उच्‍च प्राथमिक  शिष्‍यवृत्‍तीचा (इ.  वी)  कालावधी  वर्षे व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती (इ.  वी)  कालावधी  वर्षे  आहे. ही शिष्‍यवृत्‍ती शैक्षणिक वर्षातील १० महिन्‍यांसाठी  दिली जाते. शै‍क्षणिक वर्षे २०१७ मधील माहे फेब्रुवारी २०१७ च्‍या परीक्षेमधील अर्हताधारक  विद्यार्थ्‍यांनी शिष्‍यवृत्‍तीसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत.

माध्‍यमिक शालांत परीक्षेत कमीत कमी ६० टक्‍के गुण मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना  गणुवत्‍तेनुसार ही शिष्‍यवृत्‍ती देण्‍यात  येते. समाधानकारक  प्रगती आणि कनिष्‍ठ महाविद्यालय पहिल्‍या वर्षाच्‍या (इ. ११ वी ) अखेरीस घेण्‍यात येणा-या परीक्षेत किमान ४५ टक्‍के गुण मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना या शिष्‍यवृत्‍या इ. १२ वी मध्‍ये पुढे चालू राहतात. सदर येाजना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यांसाठी लागू आहे.

आर्थिकदृष्ट्या  मागास प्रवर्गातील  हुशार मुले- मुली जे माध्‍यमिक  शालांत परीक्षेत पहिल्‍या वेळी ५० टक्‍के गुण मिळवून उत्‍तीर्ण झाले आहेत.  अशांना पुढील उच्‍च शिक्षणापासून वंचित राहू नये म्‍हणून ही शिष्‍यवृत्‍ती दिली जाते. इ. ११ वी मध्‍ये ५०  टक्‍के गुण मिळवून पहिल्‍याच वेळी उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍याना ही शिष्‍यवृत्‍ती १२ वी पर्यत चालू राहते. सदर शिष्‍यवृत्‍तीसाठी  पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये  ३० हजार पेक्षा जास्‍त नसावे. सदर योजना अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यासाठी लागू आहे.

माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळेमधील विद्यार्थ्‍याना संस्‍कृत भाषेच्‍या अभ्‍यासाकडे आकर्षित करण्‍यासाठी विद्यार्थ्‍याना संस्‍कृत भाषेच्‍या गुणवत्‍ता  शिष्‍यवृत्‍या दिल्‍या जातात. इयत्‍ता  वी मधील वार्षिक परीक्षामध्‍ये संस्‍कृत या विषयात प्राप्‍त केलेल्‍या गुणवत्‍तेवर इ.  वी व १० वी आणि १० वीच्‍या गणुवत्‍तेवर इ. ११  १२ मध्‍ये शिष्‍यवृत्‍ती प्रदान केली जाते. ही योजना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यासाठी लागू आहे.  वरील योजनांची मंजूर रक्‍कम विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आधार संलग्नित बँक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात येईल. त्‍याकरिता विद्यार्थ्‍यानी आपले आधार कार्ड क्रमांक बॅंक खात्‍याशी संलग्नित करुन घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कुमार कदम यांचा ब्लॉग..