महावृत्त

पूर्व जपानमध्ये भूकंप

टोकियो - जपानच्या पूर्व भागाला आज,रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचा ५.५ रिश्टर स्केलचा जोरदार धक्का बसला. परंतु या धक्क्यामुळे कोठेही जीवित, वित्त हानी झाली नाही. हा धक्का ३० सेकंद जाणवला.इबारकी भागात सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा ५.५ रिश्टरचा धक्का बसला. या धक्क्याचा केंद्रबिंदू टोकियोपासून ५० किलोमीटरवर उत्तर पूर्वेला भूगर्भात ७० किलोमीटर खोलीवर होता. दरम्यान, या धक्क्याने टोकियो शहरही हादरले. या धक्क्यामुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पालाही हादरवले. पण कोणतीही हानी झाल्याची माहिती उपलब्ध नाही. या धक्क्यानंतर सुपरफास्ट असलेली शिनकानसेन रेल्वे तपासणीसाठी काही मिनिटे रोखली गेली. यापूर्वी मार्च २०११ मध्ये समुद्रात ९ रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. त्यावेळी उठलेल्या त्सुनामीने १८ हजार लोकांचा बळी घेतला होता.