महावृत्त

रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेत ८१ बोगस डॉक्टर : २० डॉक्टरांवर गुन्हे दाखल

नागपूर - राज्यभरातील सर्व रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम १५ मार्च ते ३१ मे २०१७ या कालावधीत राबविण्यात आली. त्यामध्ये ३७ हजार ६८ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. पैकी ६७४२ रुग्णालयांमध्ये कायद्यातील तरतूदीनुसार त्रुटी आढळून आल्या आहेत. या तपासणीमध्ये ८१ बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यापैकी २० डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

अधिक वाचा:रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेत ८१ बोगस डॉक्टर : २० डॉक्टरांवर गुन्हे दाखल

कुलभूषण जाधव यांना सल्लागार देण्यास पाकिस्तानचा नकार

इस्‍लामाबाद -  हेरगिरीच्या आरोपापखाली पाकिस्‍तानच्‍या अटकेत असलेल्‍या कुलभुषण जाधव यांना सल्‍लागार देण्‍यास पाकिस्‍तानने नकार दिला आहे. भारताने जाधव यांना सल्‍लागाराची मदत देण्‍यासंबंधी अर्ज केला होता. तो पाकिस्‍तानने फेटाळून लावला आहे. सल्‍लागाराच्‍या नावाखाली भारत कुलभूषण जाधव यांच्‍याकडून माहिती काढून घेण्‍याचा प्रयत्‍न करत आहे, असा आरोप पाकिस्‍तानने केला आहे.  तसेच व्हिएन्‍ना कॉन्‍व्‍हेंशन अंतर्गत सल्‍लागाराची मदत केवळ सामान्‍य कैद्यांना देण्‍याची तरतूद आहे. हेरगिरीच्‍या आरोपाखाली अटकेत असलेल्‍या कैद्यांना नाही. असा दावाही पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला आहे.

अधिक वाचा:कुलभूषण जाधव यांना सल्लागार देण्यास पाकिस्तानचा नकार

दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

मुंबई -  सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे आज, गुरुवारी सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. 'सत्या', फिर हेर फेरी, दाउद या सारख्या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्होरा यांच्या निधनामुळे सिने जगतामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नरेंद्र मोदी, परेश रावल, अक्षय कुमार, तुषार कपूर आदींनी ट्वीटर वरून नीरज व्होरा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अधिक वाचा:दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

‘कलवरी’ पाणबुडी नौदलात दाखल

मुंबई - संपूर्ण भारतीय बनावटीची कलवरीही पाणबुडी आज,गुरुवारी भारतीय नौदलात दाखल झाली आहे.मुंबईतल्या माजगाव डॉकयार्डवर पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीमारामण यांच्या हस्ते कलवरीचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलप्रमुख सुनिल लांबा हे उपस्थित होते. कलवरी ही स्कॉर्पियन श्रेणीतली उच्च अशा दर्जाची पाणबुडी आहे. या पाणबुडीमुळी देशाच्या नौदलाची ताकद मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.