महावृत्त

छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन पोलिस हुतात्मा

रायपूर - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील भेजी पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील जंगलामध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. तर अन्य सहाजण जखमी झाल्याची एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. स्पेशल टास्क फोर्स, जिल्हा राखीव दल आणि स्थानिक पोलिसांकडून रायपूरपासून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या भेजी आणि एलारमाद्गू जंगलात नक्षलविरोधी मोहिम राबवली जात असताना नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार करायला सुरुवात केली. यावेळी दोन्हीबाजूंकडून सुमारे दोन तास गोळीबार झाला.

अधिक वाचा:छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन पोलिस हुतात्मा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर

मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्यामुळे, प्रथमत: त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले आहे. सध्या मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करणारे पत्र लिलावती रुग्णालयाने प्रसिद्ध केले आहे.

अधिक वाचा:गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर

कॉंग्रेसचे राष्ट्रीय महाअधिवेशन पुढील महिन्यात होणार

नवी दिल्ली -  कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महाअधिवेशन येत्या १६ ते १८ मार्च रोजी दिल्लीत होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त काही महत्वाचे निर्णय तसेच काही प्रमुख ठराव होण्याची शक्यता आहे. याशिवाय नुकत्याच उघडकीस आलेल्या बँक घोटाळयासंबंधी मोदी सरकारला जाब विचाराण्याबाबत देखील ठराव होणार आहे.पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काल, शनिवारी याबाबतची बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गुलाम नबी आझाद यांच्यासह प्रमुख ३४ सदस्य उपस्थित होते.

अधिक वाचा:कॉंग्रेसचे राष्ट्रीय महाअधिवेशन पुढील महिन्यात होणार

त्रिपुरा विधानसभेच्या ६० पैकी ५९ जागांवर आज मतदान

चरिलम - त्रिपुरा विधानसभेच्या ६० पैकी ५९ जागांवर आज, रविवारी मतदान होत आहे. चरिलम विधानसभा मतदारसंघातील माकपाचे उमेदवार रामेंद्र नारायण देववर्मा यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे तिथे १२ मार्च रोजी मतदान होणार आहे. मागील २५ वर्षांपासून त्रिपुरात डाव्या पक्षाचे सरकार आहे. यंदा प्रथमच येथे भाजपा पूर्ण ताकदीने उतरला असून पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इथल्या सभा वादळी ठरल्या.

अधिक वाचा: त्रिपुरा विधानसभेच्या ६० पैकी ५९ जागांवर आज मतदान