महावृत्त

अमेरिकेतील मॅनहॅटन बस टर्मिनल येथे स्फोट : अनेकजण जखमी

न्यूयॉर्क - ऑअमेरिकेच्या सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ असलेल्या मॅनहॅटन बस टर्मिनल येथे बॉमबस्फोट झाला असून यात अनेक जण जखमी झाले आहेत.  या वृत्ताला न्यूयॉर्क पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. स्फोट झाल्यानंतर अमेरिकन पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अमेरिकन प्रशासनाने स्फोटाच्या पार्श्वभूमीवर बसची उपनगरिय सेवा काही काळासाठी बंद केली आहे.

हिवाळी अधिवेशन : पहिल्या दिवसाची सुरवात गोंधळात

नागपूर - हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन घोषणाबाजी केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी आघाडी सरकारने १५ वर्षात काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागच्या ३ वर्षात काय केलं, याचा हिशेब द्या, अशी मागणी केली. एकूणच अधिवेशनाचा आजचा दिवस गोंधळात गेला.

विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर - राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधिमंडळ परिसरातील या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळीउपसंचालक(पुणे) मोहन राठोडउपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. विधीमंडळ परिसरात प्रवेश करताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेले लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन येणाऱ्या- जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अधिक वाचा:विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या नावाची आज दुपारी काँग्रेसकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली. राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली असून येत्या १६ डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.