महावृत्त

पुस्तकांच्या गावात ‘कवितेचं गाणं होतांना...!

मुंबई - ‘कवितेचं गाणं होतांना...’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातूनसुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी कवितांचा गाण्यांपर्यंतचा प्रवास पुस्तकांच्या गावात उलगडणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी  दिली. शनिवारदि. २३ डिसेंबर२०१७ रोजी पुस्तकांचं गाव (भिलार) येथील श्री जननीमाता मंदिराजवळील सभागृहात दु. ३.०० ते सायं. ५.३० या वेळात डॉ. सलील कुलकर्णी शब्द-सुरांची मैफील सादर करणार आहेत.

अधिक वाचा:पुस्तकांच्या गावात ‘कवितेचं गाणं होतांना...!

आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

नागपूर -  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव, खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार यांसारख्या अनेक मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता असल्याने चांगलेच गाजणार असून विरोधक मंगळवारी विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत.नागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव याच्याशी मुख्यमंत्र्यांचे लागेबांध असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला आहे. त्याचबरोबर अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारला लक्ष्य केले.

अधिक वाचा:आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

नोबेल विजेते मॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलचे डूडल

नवी दिल्ली -  क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले आणि नोबेल पारितोषिक विजेते मॅक्स बॉर्न  यांची आज,१३५ वी जयंती. या जंयंतीचे औचित्य साधत गुगलेने त्यांचा जयंतीप्रित्यर्थ एक खास डूडल बनवले आहे. हे डूडल गेस्ट आर्टिस्ट काती झिलागी हिने तयार केले आहे. मुळचे जर्मनीत असलेले मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर १८८२ रोजी झाला होता. मॅक्स बॉर्न यांना १९५४ साली 'फंडामेंटल रिसर्च इन क्वांटम मॅकेनिक्स' यासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रातील त्यांच्या 'बॉर्न थेरी'चा आजही क्वांटम फिजिक्सच्या प्रत्येक रिसर्चचा आधार आहे.

मालवणच्या किनाऱ्यावर तब्बल ७० टन मासे!

मालवण (सिंधुदुर्ग) -  ‘ओखीवादळच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्यामुळे मालवण किनारपट्टीवर तब्बल ६० ते ७० टन मासळी आढळून आली आहे. या मासळीमध्ये मोठ्या प्रमाणात तारली मासळीचा समावेश असून एवढ्या मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आल्यामुळे स्थानिकांसह मच्छिमारांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी धडकलेल्या ओखी वादळामुळे सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ले, देवगड येथील समुद्र किनाऱ्याजवळील मच्छिमारांच्या होड्या आणि जाळ्यांचे कोट्यनधी रुपयांचे नुकसान झाले असून जवळजवळ आठवडाभर बंद असलेली मासेमारी गेल्या दोन दिवसांपासून पूर्ववत होऊ लागली आहे.