महावृत्त

सत्ता हे सेवेचे माध्यम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड - सत्तेच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसांच्या सेवेची संधी मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द असून सत्ता हे सेवेचे माध्यम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.श्री क्षेत्र नारायण गडावरील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व कोनशिला अनवारण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले कीश्री क्षेत्र नारायण गडाच्या विविध विकास कामांसाठी २५ कोटींच्या निधी आराखड्यास शासनाने मंजुरी दिली असून  कोटींच्या निधीचे प्रत्यक्ष वितरण केलेले आहे. तसेच शासनाकडून श्री क्षेत्र नारायण गडाचा सुनियोजित पध्दतीने विकासात्मक कामे करुन गडाला सुशोभित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा:सत्ता हे सेवेचे माध्यम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नेपाळमध्ये के.पी. शर्मा ओली पुन्हा पंतप्रधान

काठमांडू - नेपाळमध्ये के.पी. शर्मा ओली यांनी आज दुसऱ्या वेळेस पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेपाळच्या अध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांनी महाराजगंज भागातील शीतल निवास या अध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या समारंभात ६५ वर्षीय ओली यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काही आठवड्यांपूर्वीच झालेल्या निवडणूकीमध्ये ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदीय निवडणूकीमध्ये बहुमत मिळवले होते. ओली हे नेपाळचे ४१ वे पंतप्रधान आहेत. यापूर्वी ११ ऑक्‍टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१५ दरम्यानही ते पंतप्रधान होते.

पीएनबी महाघोटाळा : नीरव मोदीच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील ११,३०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा सुत्रधार हिरेव्यापारी नीरव मोदी याच्या मुंबईतील ४ , सुरतमधील ३ आणि दिल्लीतील २ ठिकाणांवर तसेच मोदीच्या भाऊ आणि पत्नीच्या घरांवरही ईडीने छापे घातले. या छापामारीमध्ये हिरे,  ज्वेलरी आणि सोने अशी तब्बल ५,१०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या महाघोटाळ्यात समावेश असलेल्या दहा अधिकाऱ्यांवर पीएनबीने निलंबनाची कारवाई केली असून याप्रकरणी आणखी काही लोकांना अटक केली जाऊ शकते, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा:पीएनबी महाघोटाळा : नीरव मोदीच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

बडोद्यात ९१ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन

बडोदा - गुजरातमधील बडोद्यात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज,शुक्रवारी दुपारी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी संमेलनाच्या पूर्वसंध्येला बडोद्याच्या राजवाड्यापासून साहित्य संमेलनाच्या आवारापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. तसेच संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजनही करण्यात आले. राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत.