महावृत्त

मुंबईत शिवसेनेच्या २ नगरसेवकांनी दिला 'स्थायी समिती सदस्य पदाचा' चा राजीनामा

मुंबई - मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेच्या आशीष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर या दोन नगरसेवकांनी आपल्या स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्टींच्या आदेशावरून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा असून सभागृह नेते यशवंत जाधव यांनी तातडीने नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे पत्र महापालिका कार्यालयास दिले आहे.

पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा सरपंच हाच पाया : मुख्यमंत्री

पुणे - पायाभूत सुविधासामाजिक सुविधा आणि आर्थिक विकास हीच आदर्शग्राम विकासाची त्रिसूत्री आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा सरपंच हाच पाया असून महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतील आदर्श गाव घडविण्याचा सर्व सरपंचांनी संकल्प करावा. शासनाच्या योजनांचा लाभ घेवून २०१९ पर्यंत आपले गाव बेघरमुक्त करण्यासाठी सर्व सरपंचांनी संकल्प करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.आळंदी येथील धारीवाल सभागृहात सकाळ समुहाच्या माध्यमातून आयोजित सातव्या सरपंच महापरिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते.

अधिक वाचा:पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा सरपंच हाच पाया : मुख्यमंत्री

पालघरजवळ टेम्पो आणि कंटेनरच्या धडकेत दोनजण ठार

पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरजवळ आज, गुरुवारी दुपारी टेम्पो आणि कंटेनर एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोचा पार चक्काचूर झाला आहे. या अपघातात मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सूटून कंटेनर समोरुन येणाऱ्या टेम्पोवर धडकला. अपघातामुळे या महामार्गावर दोन्ही दिशेने काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

फ्लोरिडात माजी विद्यार्थ्याच्या गोळीबारात १७ विद्यार्थी ठार

फ्लोरिडा  - अमेरिकेतील फ्लोरिडामधील पार्कलँड येथील शाळेत एका माजी विद्यार्थ्यांने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ विद्यार्थी ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव निकोलस क्रूझ असे असून तो १९ वर्षांचा आहे. आरोपी निकोलसने सुरुवातीला फायर अलार्म वाजवला. त्यामुळे आग लागल्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची पळापळ झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला. आरोपीने गॅस मास्क लावला होता आणि त्याच्याकडे स्मोक ग्रेनेड होते, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शिताफीने पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.