महावृत्त

परळीत साखर कारखान्यात स्फोट : १२ कामगार जखमी

बीड - परळीजवळील पांगरी येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ऊसाच्या रसाच्या टाकीचा स्फोट होऊन १२ कामगार होरपळून जखमी झाल्याची घटना घडली आहे. अभियंता धनाजी देशमुख, लहू डाके, सुनील भंडारे,  हनुमंत संगापुरे,  सुमित भंडारे,  गौतम घुमरे,  सुभाष कराड,  रामभाऊ नागरगोजे,  चंद्रकांत मिसाळ,  आदिनाथ भंडारे,  महादेव मुंडे अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. टाकीतील गरम रसामुळे वाफ साचल्याने टाकीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

सोनिया गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालू प्रसाद यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज ७१ वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना टि्वटरवरून शुभेच्छा देत 'सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य लाभो,' असे टि्वट केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनीही सोनिया गांधी यांना टि्वटर 'समर्पण, त्याग, बलिदान आणि कठीण परिस्थितही असीम धाडस दाखविणाऱ्या मॅडम सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असे टि्वट केले आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही टि्वट करत सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी सरकारचा साडेतीन वर्षात ३ हजार ७५५ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च

नवी दिल्ली - मोदी सरकारने आपल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात तब्बल ३,७५५ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केल्याची माहिती माहिती अधिकारातंर्गत उघड झाली आहे. हा खर्च एप्रिल २०१४ ते ऑक्टोंबर २०१७ या कालावधीत करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामधील जाहीरातीवर १,६५६ कोटी रुपये खर्चं करण्यात आले असून त्यात कम्युनिटी रेडिओ, डिजिटल सिनेमा, दूरदर्शन, इंटरनेट, एसएमएस आणि टीव्हीचा समावेश आहे. तर प्रिंट मीडियामधील जाहीरातींवर सरकारने १,६९८ कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. पोस्टर्स, बुकलेट, होर्डींग, कॅलेंडरवरील जाहीरात तसेच जाहीरात फलक, यासाठी सरकारकडून ३९९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अधिक वाचा:मोदी सरकारचा साडेतीन वर्षात ३ हजार ७५५ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅडिंग

नाशिक – लातूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे आज, शनिवारी सकाळी नाशिकमध्ये क्षमतेपेक्षा वजन जास्त झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अखेर त्यांचा खानसाम सतीश काणेकरला उतरवल्यानंतर हेलीकॉप्टरने पुन्हा टेकऑफ केले आणि औरंगाबादकडे ते रवाना झाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य तिघेजण नाशिक दौरा संपवून औरंगाबादकडे रवाना होत असताना ही घटना घडली.