महावृत्त

‘ पीएनबी माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही’ : नीरव मोदी

मुंबई - पीएनबी बँकेने आणि प्रसार माध्यमांनी माझ्या केलेल्य बदनामीमुळे माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता बँकेचे कर्ज चुकते करण्याची माझी क्षमताही नाही. त्यामुळे पीएनबी माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही’,असे पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी महाघोटाळ्याचा सुत्रधार नीरव मोदी याने पीएनबी बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या प्रशासनाला उद्देशून लिहण्यात आलेले हे पत्र १५ किंवा १६ फेब्रुवारीला लिहीण्यात आले आहे.

अधिक वाचा:‘ पीएनबी माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही’ : नीरव मोदी

रतन टाटा यांना महाउद्योग रत्न तर गौतम सिंघानिया यांना महाउद्योग श्री पुरस्कार प्रदान

मुंबई - जगातल्या सातही खंडात आपल्या उद्योगाचा विस्तार असणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना राज्य शासनाच्यावतीने काल,सोमवारी 'महा उद्योग रत्न पुरस्कार' तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे उद्योग जगतामध्ये रेमंड समूहाचे नाव उंचावताना भारतीय उद्योगांच्या नावाचा दबदबा जागतिक स्तरावर निर्माण करणाऱ्या गौतम सिंघानिया यांना 'महा उद्योग श्री पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कारांची सुरुवात यावर्षीपासून करण्यात आली असून या दोन्ही उद्योग रत्नांचा गौरव हा राज्याचा गौरव आहे अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

अधिक वाचा:रतन टाटा यांना महाउद्योग रत्न तर गौतम सिंघानिया यांना महाउद्योग श्री पुरस्कार प्रदान

औरंगाबाद विद्यापीठाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा याना अटक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा याना काल,सोमवारी रात्री उशिरा नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगाराची तीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हेशाखेने अटक केली. मंझा यांनी एका सुशिक्षित बेरोजगाराला कारकुनाची नोकरी लावतो असे सांगून तीन लाख रुपये घेतले होते. पण त्याला नोकरी लावली नाही. त्यामुळे बेरीजगार तरुणाने मंझा यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केल्यावर मंझा याने त्यास तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र तो धननादेश बँकेत वठला नाही. त्यामुळे सदर तरुणाने मंझा यांच्याविरुद्ध पोलिसस्थानकात फसवणूकीची तक्रार दाखल केल्यांनंतर मंझा याना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या अटकेची बातमी पसरताच विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली असून याप्रकरणी उलटसुलट चर्चा सुरु आहे.

शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडलायावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,  शिक्षण मंत्री विनोद तावडे,  पर्यटन मंत्री जयकुमार रावलआमदार शरद सोनावणेविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवीविशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटीलजिल्हाधिकारी सौरभ रावजिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक उपस्थित होते.

अधिक वाचा:शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न