महावृत्त

महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे उद्या वितरण

मुंबई - महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमीतर्फे  २०१६-१७ चा पुरस्कार सोहळा उद्या १७ जानेवारी रोजी सायं ६ वाजता रंग शारदा नाट्यमंदिरके.सी. मार्गबांद्रा रिक्लेमेशनबांद्रा (प) येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमीतर्फे  हिन्दी भाषा व साहित्याच्या ‍ विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या पुरस्कार सोहळयामध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिरविशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच हा पुरस्कार सोहळा  सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेमहापौर विश्वनाथ महाडेश्वरखासदार माजिद मेननखासदार पुनम महाजनआमदार अशोक ऊर्फ भाई जगतापआमदार ॲङ आशिष शेलार यांच्या प्रमुख ‍उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.

अधिक वाचा:महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे उद्या वितरण

केंद्र सरकारकडून हज यात्रेचे अनुदान बंद

नवी दिल्ली – हज यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा फायदा एजंट घेत असल्याच्या कारणावरुन अनुदान बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज,मंगळवारी घेतला. सकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका १ कोटी ७५ लाख हज यात्रेकरूंना बसणार आहे. मात्र, हे अनुदान बंद करतानाच गरीब मुस्लिमांसाठी वेगळी व्यवस्था करणार असल्याचे मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं. तर अल्पसंख्याकांना सवलतींशिवाय सशक्त करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयांतर्गंत हज सबसिडी हळूहळू २०२२ पर्यंत संपुष्टात आणण्याचे आदेश दिले होते.

विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन

मुंबई - विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे आज,मंगळवारी पुण्यात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. फरांदे घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अधिक वाचा:विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन

बगदादमध्ये आत्मघाती स्फोटात २६ जण ठार

बगदाद - बगदादमध्ये झालेल्या दुहेरी आत्मघाती स्फोटात एकूण २६ जण ठार झाले तर किमान ९०  जण जखमी झाले आहेत. मध्य बगदाद मधील अल तय्यरन चौकात अंगावर स्फोटके लपेटलेल्या दोन जणांनी स्व:ताला उडवून दिले त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. रूग्णालयात जे लोक दाखल करण्यात आले आहेत त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. रूग्णालयांमध्ये एकूण २६ जणांचे मृतदेह मोजण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. बगदाद मधील हिंसाचाराचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे त्यामुळे सरकार पुढे पेच निर्माण झाला आहे.