महावृत्त

बेपत्ता झालेले प्रवीण तोगडिया उद्यानात बेशुद्धावस्थेत आढळले

अहमदाबाद - विश्‍व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया सोमवारी रात्री गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एका उद्यानात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना उपचारासाठी शहरातील चंद्रमणी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याआधी ते बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने दिवसभर मोठी खळबळ उडाली होती. तोगडिया यांच्याविरोधात राजस्थानात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. त्या जुन्या प्रकरणात ६२  वर्षीय तोगडिया यांना अटक करण्यासाठी राजस्थान पोलिसांचे एक पथक अहमदाबादेत दाखल झाले. त्या पथकाला तोगडिया त्यांच्या निवासस्थानी आढळले नाहीत. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा तातडीने समजू शकला नाही

अधिक वाचा:बेपत्ता झालेले प्रवीण तोगडिया उद्यानात बेशुद्धावस्थेत आढळले

माजी केंद्रीय मंत्री रघुनाथ झा यांचे निधन

नवी  दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे (सप) नेते रघुनाथ झा यांचे सोमवारीयेथील राममनोहर लोहिया रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये झा यांनी अवजड उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यावेळी त्यांनीं केंद्रीय मंत्रिमंडळात लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रतिनिधित्व केले. मात्र, काही  मतभेदांमुळे त्यांनी २०१५ मध्ये राजदला सलाम ठोकून त्यांनी सपमध्ये प्रवेश केला.

आता भाडेपट्टयाच्या जमिनीवरही नवीन पर्यटन उद्योगासाठी मुद्रांक शुल्क माफी

मुंबई -  महाराष्ट्र पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्यासाठी मुद्रांक शुल्क तसेच राज्य सरकारच्या विविध कर सवलती देण्यात येतात. त्या अनुषंगाने ऑक्टोबर २०१६ मध्ये महसूल व वनविभागाने काढलेल्या आदेशात भाडेपट्टयाने द्यावयाच्या जमिनीबाबतचा उल्लेख राहून गेल्याने नवीन पर्यटन उद्योग सुरु करण्यासाठी या सवलतींचा लाभ मिळत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी पाठपुरावा केल्यामुळे महसूल व वनविभागाने पूर्वीचा आदेश रद्द करुन भाडपट्टयाचा समावेश करुन नवीन आदेश काढला आहे.

अधिक वाचा:आता भाडेपट्टयाच्या जमिनीवरही नवीन पर्यटन उद्योगासाठी मुद्रांक शुल्क माफी

अर्भक मृत्यू पाठोपाठ महाराष्ट्राच्या बालमृत्यू दरात तीन अंकांनी घट

मुंबई - अर्भक मृत्यू (० ते १ वर्ष) पाठोपाठ महाराष्ट्राचा बालमृत्यू (१ ते ५ वर्ष) दर २४ वरून २१ वर आला असून मागील वर्षापेक्षा तीन अंकांनी घट झाल्याची नोंद केंद्र शासनाच्या ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम’ (एसआरएस) २०१६ च्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालानुसार केरळ,तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्राचा बालमृत्यू दर देशात कमी झाल्याचे नमुद केले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणालेआरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करीत आहे त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले आहे. मात्र अर्भक व बाल मृत्यू दर अजून कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

अधिक वाचा:अर्भक मृत्यू पाठोपाठ महाराष्ट्राच्या बालमृत्यू दरात तीन अंकांनी घट