महावृत्त

शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर शाळेचा दर्जा ठरावा : विनोद तावडे

नवी दिल्ली - शाळा सिद्धी अंतर्गत शिक्षणाचा दर्जा हा शाळेतील पायाभूत सुविधांसह शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर ठरावाअशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल,सोमवारी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत मांडली. दोन दिवसीय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची (केब) ६५ वी वार्षिक बैठकीचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आलेबैठकीच्या पहिल्या दिवशी शालेय शिक्षणाविषयीची बैठक झालीयावेळी तावडे यांनी ही सूचना मांडली.बैठकीची अध्यक्षता केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंगविविध राज्यातील शालेय शिक्षण मंत्री,  केंद्रीय शालेय शिक्षण सचिवराज्यांतील शालेय शिक्षण सचिव उपस्थित होते.

अधिक वाचा:शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर शाळेचा दर्जा ठरावा : विनोद तावडे

न्यायमूर्ती-सरन्यायाधीशांतील वाद संपला : बार काऊन्सिलचा दावा

नवी दिल्ली - सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायधीश यांच्यातील वाद संपला असल्याचा दावा देशाच्या बार कौंसिलचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी केला आहे. न्यायप्रक्रियेतील हा वाद अंतर्गत होता. त्याचा काही जणांनी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यात यशस्वी होऊ शकले नाही, असेही मिश्रा यावेळी म्हणाले.सर्वोच्च न्यायालयातील कारभार योग्य प्रकारे चालत नसल्याची तक्रार जे चेलमेश्वर, रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. सरन्यायाधीशांना पत्र लिहूनही काही फायदा झाला नाही असा आरोपही त्यांनी केला होता. सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्रही त्यांनी सार्वजनिक केले होते.

अधिक वाचा:न्यायमूर्ती-सरन्यायाधीशांतील वाद संपला : बार काऊन्सिलचा दावा

भारतीय सैन्याने साजरा केला ७० वा लष्कर दिन

नवी दिल्ली -  भारतीय सैन्याने आज, सोमवारी ७० वा लष्कर दिन साजरा करत आहे. भारताचे पहिले लष्कर प्रमुख जनरल के.एम. करिअप्पा यांच्या सन्मानात १५ जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नेवी चीफ सुनील लांबा आणि एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी अमर जवान ज्योतीवर शहिदांन श्रद्धांजली वाहिली. आर्मी चीफ बिपिन रावत यांनी करिअप्पा ग्राउंडमध्ये परेडची सलामी घेतली. तसेच १५ जवानांचा मेडल देऊन सन्मान केला. ज्यामध्ये ५ मरणोत्तर मेडल होते.

झारखंडमध्ये ट्रकची रिक्षाला धडक : ११ जण जागीच ठार

रांची - झारखंडमधील गुमला जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग २३ वर ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पुरुष, ५ महिला आणि   लहान मुलांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत अनेक जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.सर्व जखमींना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफि मेडिकल सायन्स येथे दाखल करण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे चालकाला वाहन चालवण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या दुर्घटनेसंदर्भात शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे.