महावृत्त

न्यायव्यवस्थेच्या कारभाराबाबत न्यायमूर्तींचेच टीकास्त्र

नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेत लोकशाही धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली. न्यायालयाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा असून, हे असेच सुरू राहिले, तर लोकशाही टिकणार नाही, अशी भीतीही त्यांनी या वेळी केली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालया न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. आज,शुक्रवारी दुपारी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ,  न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे जेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी ही पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात ज्येष्ठ आहेत.

अधिक वाचा:न्यायव्यवस्थेच्या कारभाराबाबत न्यायमूर्तींचेच टीकास्त्र

पाच महिन्यानंतर अजयसिंग आठवालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

ठाणे - तब्बल पाच महिन्यानंतर अजयसिंह आठवाल याचा मृतदेह त्याच्या  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. २९ऑगस्टच्या पुरामध्ये अजय आठवाल हा वाहून गेला होता. त्यानंतर काही दिवसांनी उरण येथे एक प्रेत सापडले होते.या प्रेताचा आणि त्याच्या आईचा डीएनए सामाईक झाल्यानंतर हे प्रेत आज, शुक्रवारी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमध्ये दोन मुलींना वाचविण्याच्या प्रयत्नात रामवाडीरामनगर येथे राहणारा अजय झिलेसिंग आठवाल हा तरुण वाहून गेला होता. अजय आठवाल हा विवाहित असून त्याला तीन मुली आहेत. तरपत्नी सध्या गर्भवती आहे.

अधिक वाचा:पाच महिन्यानंतर अजयसिंग आठवालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

२० हजार कोटी खर्चाचा वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करणार : नितीन गडकरी

ठाणे - मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्ग २० हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार असून येत्या ३ महिन्यात भू संपादन व आवश्यक कामे सुरु होतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल,गुरुवारी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत असल्याने मुंबई महानगर क्षेत्र हे आगामी काळात देशातील महत्वाचे ग्रोथ इंजिन बनेल असा विश्वास व्यक्त केला. वर्सोवा खाडीवर नव्या चौपदरी पुलाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील इतर ७ रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री त्याचप्रमाणे  केंद्रीय महामार्ग मंत्री यांच्या हस्ते मिरा रोड येथील एस के स्टोन मैदान येथे इलेक्ट्रॉनिक नामफलकाची कळ दाबून झाले,यावेळी ते बोलत होते.

अधिक वाचा:२० हजार कोटी खर्चाचा वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करणार : नितीन गडकरी

नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी

मुंबई - राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये (बजेट) वाढ करणार असल्याचे आश्वासन अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. हज हाऊस येथे कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा -२०१८ संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरुंची निवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.राज्यमंत्री कांबळे पुढे म्हणाले, हज समितीमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. ही समिती प्रत्येक घटकातल्या व्यक्तीची मदत करण्यात अग्रेसर आहे. यामुळेच या समितीची अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीमध्येही वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. राज्यासह देशभरातून हज यात्रेला दरवर्षी हजारो यात्रेकरु जात असतात.

अधिक वाचा:नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी