महावृत्त

रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यानेही केला ८०० कोटींचा बँक घोटाळा

कानपूर - पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरण ताजे असतानाच रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांनी बॅंक ऑफ बडोदाला ८०० कोटी रुपयांना गंडावल्याची माहिती समोर आली आहे. ८०० कोटींचे कर्ज चुकविण्याच्या प्रकरणात बॅंक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून आज, सोमवारी पहाटे चार वाजता 'सीबीआय'ने विक्रम कोठारी  यास ताब्यात घेतले असून कानपुरमध्ये कोठारीच्या कानपुरच्या टिळक नगरमधील 'संतुष्टी',रोटोमॅक ऑफिस आणि एका ठिकाणावर सीबीआयने छापा मारला. तसेच याप्रकरणी सीबीआय टीमने विक्रम कोठारीची पत्नी आणि मुलांकडे चौकशी केली.

अधिक वाचा:रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यानेही केला ८०० कोटींचा बँक घोटाळा

पीएनबी घोटाळ्यामुळे सोने स्वस्त झाले

मुंबई - पंजाब नॅशनल बँकतील घोटाळ्याचा परिणाम सोन्यावर झाला असून सगळे सोने व्यापारी त्यांच्याकडील सोन्याचा असलेला स्टॉक संपवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सामान्य बाजारात सोन्याच्या दरात मोठी कपात झाली आहे.. १८ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रती तोळा ३१,६६६ रुपये होता. आता तो ३१,६२५ रुपये झाला आहे. म्हणजेच सोन्याचा दर ४५ रुपयांनी घसरला आहे. दरम्यान, पीएनबी घोटाळ्यातनंतर आता ज्वेलर्सवर तसेच सोन्याच्या खरेदी-विक्रीवर अधिकाऱ्यांची करडी नजर असून ज्वेलर्सचे खाते तपासले जात असल्यामुळे सोने व्यापारीही धास्तावले आहेत.

कोल्हापूरात शिवज्योत घेऊन जाताना अपघात : पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळील नागाव फाट्याजवळ आंबेडकर नगर येथे अपघातामध्ये शिवजयंती निमित्त पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात असलेले वालचंद महाविद्यालयातील पाच विद्यार्थी ठार झाले असून  २५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात आज, सोमवारी पहाटे साडेचार वाजता झाला. केतन प्रदीप खोचे ( वय २१), सुमित संजय कुलकर्णी (वय २३), अरुण अंबादास बोंडे ( वय २२), सुशांत विजय पाटील ( वय २२) आणि प्रवीण शांताराम त्रिलोटकर ( वय २३) अशी या अपघातातली मृतांची नावे आहेत.

अधिक वाचा:कोल्हापूरात शिवज्योत घेऊन जाताना अपघात : पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई - महाराष्ट्र राज्य देशातील  पहिले ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करणारे राज्य असून देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले होते.ते रविवारी बिकेसी मैदानावर आयोजीत ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ जागतिक गुंतवणूक दारांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. नरेंद्र मोदी म्हणाले कीफडणवीस सरकारच्या सुधारणावादी धोरणांमुळे  उद्योग क्षेत्राला एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे. उद्योंगामुळे परिवर्तन आलेले आहे. गेल्या तीन वर्षामध्ये केलेल्या अथक प्रयत्नांमुळे देशभर फाईव्ह ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीची चर्चा होऊ लागली आहे.

अधिक वाचा:देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान : पंतप्रधान नरेंद्र मोदी