महावृत्त

केंद्रीय कामगारमंत्री सीसराम ओला यांचे निधन

नवी दिल्ली – राजस्थानमधील कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री सीसराम ओला (वय ८६ वर्षे) यांचे आज, रविवारी येथील रुग्णालयात पोटाच्या विकारामुळे निधन झाले. पाचवेळा संसदेचे सदस्य राहिलेले ओला हे राजस्थानमध्ये जाट समुदायाचे प्रभाव असलेल्या झुनझुनू मतदारसंघातून निवडून आले होते. यावर्षी जून महिन्यात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी त्यांची केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रीम्हणून निवड झाली होती.

“इंडियन आयडॉल” संदीप आचार्यचे अकाली निधन

गुडगाव - “सोनी एंटरटेनमेंट” या दूरचित्र वाहिनीच्या “इंडियन आयडॉल” स्पर्धेतील दुसऱ्या पर्वाचा विजेता गायक संदीप आचार्य याचे आज, रविवारी वयाच्या केवळ २९व्या वर्षी गुडगाव येथील मेंदांता रुग्णालयामध्ये अकाली निधन झाले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नसले तरी संदीपने त्याच्या धोकादायक आजाराकडे केलेले दुर्लक्ष त्याच्यासाठी प्राणघातक ठरले असावे, असे सांगण्यात आले. 

अधिक वाचा:“इंडियन आयडॉल” संदीप आचार्यचे अकाली निधन

नेल्सन मंडेला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जोहान्सबर्ग दक्षिण अफ्रिकेतील  वर्णद्वेषाविरुद्धच्या  लढ्याचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवंशीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या पार्थिवावर आज, रविवारी त्यांच्या ईस्टर्न केपमधील कुनू या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. राष्ट्रपिता मंडेला यांचे गेल्या शुक्रवारी वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. दक्षिण आफ्रिकेत मंडेला हे मदिबा या आदरार्थी नावाने ओळखले जात. ते अन्यायाविरुध्द लढणाऱ्या जगभरातील नेत्यांसाठी एक प्रेरणास्थान होते.

अधिक वाचा:नेल्सन मंडेला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

महाराष्ट्रातील औषध विक्रेत्यांचा उद्यापासून तीन दिवसाचा "बंद"

पुणे - महाराष्ट्रातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेने उद्या, सोमवारपासून पुकारलेल्या तीन दिवसाच्या "बंद"ला राज्य सरकारने एका आदेशाद्वारे मनाई केली आहे. या आदेशानुसार तीन दिवसाच्या "बंद"मध्ये सामिल होणाऱ्या औषध विक्रेत्यांवर अत्यावश्‍यक सेवा कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसा इशारा या आदेशासंर्भात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत देण्यात आला आहे.

अधिक वाचा:महाराष्ट्रातील औषध विक्रेत्यांचा उद्यापासून तीन दिवसाचा "बंद"