महावृत्त

अरविंद केजरीवाल आणि सहकाऱ्यांची मेट्रोयात्रा

गाझियाबाद – दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल तसेच त्यांचे सहकारी उद्या, शनिवारी रामलीला मैदनावर होणाऱ्या त्यांच्या पदाच्या शपथ सोहळ्याला जाण्यासाठी मेट्रो रेल्वेचा उपयोग करणार आहेत. आज, शुक्रवारी आपल्या निवासस्थानी जनता दरबार आटोपल्यानंतर केजरीवाल यांनी ही माहिती दिली. केजरीवाल यांच्यासह त्यांचा पक्षाचे सर्व आमदारही कार्यक्रमस्थळी मेट्रोनेच जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

उत्तर प्रदेशातील दंगल पीडितांच्या मदत शिबिरांमध्ये ३४ लहान मुलांचा मृत्यू

लखनौ उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर व शाल्मली जिल्ह्यांमध्ये दंगल पीडितांसाठी उभारलेल्या मदत शिबिरांमधील बारा वर्षे वयाखालील सुमारे ३४ मुलांचा यावर्षी ७ सप्टेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत मृत्यू झाला असल्याचा अहवाल सरकारी उच्चस्तरीय समितीने दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारने मदत शिबिरातील लहान मुलांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमली होती. 

अधिक वाचा:उत्तर प्रदेशातील दंगल पीडितांच्या मदत शिबिरांमध्ये ३४ लहान मुलांचा मृत्यू

काश्‍मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी : मोसमातील सर्वांत कमी तापमान

श्रीनगर - संपूर्ण काश्‍मीर खोऱ्यामध्ये थंडीची जोरदार लाट आली असून लेहमध्ये बुधवारी रात्री उणे १४.१ अंश तर गुलमर्गमध्ये उणे ७.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान आहे. श्रीनगर, पहलगाम (उणे ७.२ अंश तापमान) व लेह याबरोबरच काश्‍मीरमधील सर्व ठिकाणी पारा अधिकाधिक खाली उतरत असल्यामुळे थंडीचा कडाका सतत वाढत आहे.

अधिक वाचा:काश्‍मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी : मोसमातील सर्वांत कमी तापमान

राज्यात येत्या पाच वर्षात साठ हजार पोलीस भरती

पुणे - पुढील पाच वर्षात सुमारे ६० हजार पोलिसांची पदे भरली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आमदार मोहन जोशी यांच्या आमदार निधीतून पोलीस आयुक्त कार्यालयात वाहतूक पोलीस प्रशिक्षण व नागरिकांच्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या संस्कारभवन या सभागृहाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. महापौर चंचला कोद्रे, माजी गृह राज्यमंत्री आमदार रमेश बागवे, आमदार मोहन जोशी, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा:राज्यात येत्या पाच वर्षात साठ हजार पोलीस भरती