महावृत्त

ओम्नीकारला आग लागून दोन ठार

बीड - कल्याण राज्य मार्गावर अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावाजवळ ओम्नी कारसह जळालेले दोन मृतदेह आज, गुरूवारी सकाळी आढळल्याचे पोलिस सुत्रांनी दिले. या दोन्ही मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नसल्याचे सुत्रांकडून कळते.

दुसरी क्रिकेट कसोटी : भारतीय संघाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

डर्बन (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यामध्ये फारशी प्रभावी कामगिरी न करू शकलेल्या रवीचंद्रन आश्‍विनला दुसऱ्या कसोटी सामन्यात वगळण्यात आले आहे. त्याच्याऐवजी डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेनेही प्रभावहीन इम्रान ताहीरला वगळून रॉबीन पीटरसनला संधी दिली आहे.

अधिक वाचा:दुसरी क्रिकेट कसोटी : भारतीय संघाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

गोव्यातील भारतीय नागरिक घेताहेत पोर्तुगालचे नागरिकत्त्व

पणजी गोव्यातील ११,५०० नागरिकांनी गेल्या पाच वर्षांत आपले भारतीय नागरिकत्त्व रद्द करून पोर्तुगालचे नागरिकत्त्व स्वीकारले आहे. पणजीतील निवडणूक आयोगाकडील नोंदींवरून ही माहिती उघड झाली आहे. ३१ जानेवारी, २००८ ते ३१ जानेवारी, २०१३ या कालावधीतील ही आकडेवारी आहे. दररोज सरासरी किमान सहा नागरिक पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारत असल्याचे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

अधिक वाचा:गोव्यातील भारतीय नागरिक घेताहेत पोर्तुगालचे नागरिकत्त्व

`ट्राय’चा दूरसंचार कंपन्यांना दणका

नवी दिल्ली - मोबाईल सेवा वापरणा-या ग्राहकांना योग्य दर्जाची सेवा न दिल्याने दूरसंचार  नियामक `ट्रायने ९ दूरसंचार कंपन्यांना दंड आकारला आहे. हा दंड संयुक्तरित्या कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ट्रायच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलवर  योग्य सेवा ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास कमी पडल्याने १४. लाख रुपये दंड ठोठावला आहे.

अधिक वाचा:`ट्राय’चा दूरसंचार कंपन्यांना दणका