महावृत्त

मुंबईत साथीच्या आजारात वाढ

मुंबई -   बदलत्या हवामानाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसत आहे. मुंबईत सध्या फिवर, डेंग्यू, मलेरिया तसेच गॅस्ट्रोने डोके वर काढल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.मुंबईतील बदलत्या हवामाचा बदल साथींच्या आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. मुंबई महानगर पालिकेने रुग्णालयातील आजारांचा डिसेंबर महिन्याचा अहवाल नुकताच सादर केला. यात साथीचे ३७८८, मलेरिया ४७९, डेंग्यूचे ५२ तर गॅस्ट्रोचे ६५९ रुग्ण आढळले आहेत.

अधिक वाचा:मुंबईत साथीच्या आजारात वाढ

बगदादमध्ये साखळी बॉम्बस्फोटात २२ जण ठार

बगदाद - इराकची राजधानी बगदाद येथे आज, बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या साखळी बॉम्बस्फोटात २२ जण ठार, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इराकमधील दक्षिण दोरा परिसरात सणानिमित्त एका प्रार्थना स्थळाजवळ लोक मोठय़ा संख्येने जमले होते. या परिसरात दहशतवाद्यांनी कार बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये १५ जण जागीच ठार झाले तर ३० जण गंभीर जखमी झाले.

अधिक वाचा:बगदादमध्ये साखळी बॉम्बस्फोटात २२ जण ठार

उत्तराखंडला भूकंपाचा सौम्य धक्का

डेहराडून - उत्तराखंडच्या काही भागांत आज, बुधवारी सकाळी भूकंपाचा सौम्य हादरा बसल्याचे वृत्त येथील हवामान विभागाकडून देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलनुसार ४.० एवढी होती. तर भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरकाशी येथे होता. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.

केजरीवालांच्या शपथविधीला जाण्याचा विचार करू – अण्णा हजारे

राळेगण - आम आदमी पार्टी सरकारच्या २८ डिसेंबरला होणा-या शपथविधीचे आमंत्रण अद्याप आपल्याला प्राप्त झालेले नाही. मात्र, आमंत्रण आल्यानंतर प्रकृती ठीक असेल, तर आपण जाण्याचा विचार करू, असे संकेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे दिले.

अधिक वाचा:केजरीवालांच्या शपथविधीला जाण्याचा विचार करू – अण्णा हजारे