महावृत्त

अंदमान निकोबार जवळ प्रवासी बोटीला जलसमाधी

मुंबई - अंदमानची नॉर्थ बे बेटाजवळ आज दुपारी ३.५० मिनिटांनी अक्वा मरिन नावाची प्रवासी बोट बुडून २१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही बोट नॉर्थ बेवरुन ४० प्रवाशांना घेवून पोर्ट ब्लेयरकडे परत येतांना नॉर्थ बे ते रॉय आयलंड दरम्यान हा अपघात झाला. या अपघातग्रस्त बोटीतील १७ प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. तर उर्वरीत प्रवाशांचा नेव्हीच्यावतीने शोध घेतला जात आहे.

अधिक वाचा:अंदमान निकोबार जवळ प्रवासी बोटीला जलसमाधी

डॉ. माशेलकर, योगाचार्य अय्यंगार यांना 'पद्मविभूषण' जाहीर

नवी दिल्ली - यावर्षीच्या पद्‌म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये आपले मोलाचे योगदान देणार्‍या व्यक्तींना पद्‌मविभूषण, पद्‌मभूषण आणि पद्‌मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार या पुणेकरांना 'पद्मविभूषण' हा सन्मान जाहीर झाला आहे.

अधिक वाचा:डॉ. माशेलकर, योगाचार्य अय्यंगार यांना 'पद्मविभूषण' जाहीर

ऑनलाईन पॅनकार्ड बनविण्याची प्रक्रिया कठीण होणार

नवी दिल्ली - सरकारने पॅनकार्ड नियम आणखी कडक बनवले आहेत. आता पॅनकार्ड बनविण्यासाठी कागदपत्रांच्या नकले बरोबरच मूळ प्रतही तपासली जाणार आहेत. सीबीडीटीच्या पत्रकानुसार आता पॅनकार्ड बनविण्यासाठी ओळखपत्र आणि पत्त्याबरोबरच जन्म तारखेचा खरा दाखलाही पॅनकार्ड सेंटरवर दाखवावा लागणार आहे. सरकारच्या या नियमामुळे बनावट पॅनकार्ड बनविण्याच्या प्रकारांना आळा बसेल पण थर्ड पार्टी किंवा ऑनलाईन पॅनकार्ड बनविण्याची प्रक्रिया कठीण होणार आहे.

इंडोनेशियाला भूकंपाचा जोरदार धक्का

जाकार्ता - इंडोनेशियातील जावा बेटाला आज, शनिवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता ६.१ रिश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. सुमारे २० सेकंद भूकंपाचे हादरे जाणवत होते.  या हाद-यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले होते. अशी माहिती इंडोनेशियाच्या अधिका-यांनी दिली. या भूकंपात पडझड अथवा जीवित हानी झाली नसून त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.