महावृत्त

एसएमएस सेवेला शासनदरबारी पुरावा म्हणुन मान्यता मिळणार

नवी दिल्ली - शासनाच्या सर्व विभागातर्फे आता एसएसएस सेवेला मान्यता देण्यात येणार आहे. भविष्यात एसएमएसद्वारे आपण ज्या शासकीय सेवेचा लाभ घेतो. उदाहरणार्थ पंजीकरण, भूगतान आणि इतर सेवा. यासाठी एसएमएसचा पुरावा ग्राह्य मानला जाईल. २३ डिसेंबरला केंद्रीय सरकारतर्फे २४१ ऍप्लिकेशनसाठी एक प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. सदर सुविधांच्या अंमलबजावणीसाठी जवळपास १०० शासकीय कार्यालयामध्ये यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये माहितीच्या हक्क, आधारकार्ड, आरोग्य, शिक्षण यांचा समावेश आहे.

अधिक वाचा:एसएमएस सेवेला शासनदरबारी पुरावा म्हणुन मान्यता मिळणार

इशरत प्रकरणी मोदींना दिलासा

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना सीबीआयने मोठाच दिलासा दिला आहे. गेली १० वर्षे गाजत असणा-या इशरत जहाँ बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोदींचे उजवे हात मानले जाणा-या अमित शहा यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. शहा यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे सीबीआय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे तत्कालीन अधिकारी राजिंदर कुमार यांच्या विरोधात मात्र खटला चालणार आहे.

अधिक वाचा:इशरत प्रकरणी मोदींना दिलासा

केजरीवाल यांनी सुरक्षाव्यवस्थेप्रमाणेच सरकारी बंगलाही नाकारला

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला सुरक्षाव्यवस्थेप्रमाणेच सरकारी बंगलाही नको असल्याचे सरकारी यंत्रणेला कळविले आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीचे मुख्य सचिव डी.एम.सपोलिया यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना "झेड" सुरक्षाव्यवस्थेबरोबर इतर सरकारी व्हीआयपी सुविधा देण्याबाबतही विचारणा केली होती.

अधिक वाचा:केजरीवाल यांनी सुरक्षाव्यवस्थेप्रमाणेच सरकारी बंगलाही नाकारला

दक्षिण आशिया व्यापार क्षेत्र सुधारणासाठी भारत प्रयत्नशील 

नवी दिल्ली - भारत दक्षिण आशियामध्ये व्यापार आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील प्रकल्पांच्या  विकासासाठी भारत प्रयत्नशील आहे. यासाठी भारत नवीन `दक्षिण-आशिया विकास बँक’ सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताच्या वाणिज्य विभागाने ज्या बँका `सार्क’ देशात व्यापारी दृष्टीकोनातून वाढ होण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांची यादी बनविली आहे.

अधिक वाचा:दक्षिण आशिया व्यापार क्षेत्र सुधारणासाठी भारत प्रयत्नशील