महावृत्त

काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतुक ठप्प

श्रीनगर - केरन आणि सोनमर्ग भागातील हिमकडे कोसळण्याची शक्यता जम्मू-काश्‍मीरमधील हवामान विभागाने वर्तवली असून शक्यतो रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती येथील सुत्रांनी दिली.याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यामुळे येथील रस्ते वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे. येथील प्रशासनाने नागरिकांना बर्फवृष्टीमध्ये प्रवास न करण्याचा तसेच घराच्या छतावर साचलेला बर्फ वेळच्या वेळी साफ करण्याचे फर्मान सोडले आहे. तसेच काश्‍मीर खोऱ्यामध्ये आणखी किमान सात दिवस हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बिहारच्या सोमगडमधील अविवाहित मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

पाटणा - बिहारमधील सोमगड ग्रामपंचायतीने गावातील अविवाहित मुलींनी मोबाईल फोनचा वापर करू नये, असा फतवा काढला असून एखाद्या मुलीने या फतव्याचा भंग केल्यास तिच्या कुटुंबीयांना जबर दंड आकारला जाईल, असा इशाराही दिला आहे. बिहारच्या पश्‍चिम चंपारण्य जिल्ह्यातील सोमगड गावच्या महिला सरपंचाचे पती झाकीर अन्सारी हेच या ग्रामपंचायतीचा कारभार पाहात असून काल, मंगळवारी रात्री झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अधिक वाचा:बिहारच्या सोमगडमधील अविवाहित मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

मध्य प्रदेश : तुरुंगातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पुन्हा अटक

बरवानी (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील खांडवा येथील तुरुंगातून पळून गेलेल्या स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या पाच संशयित दहशतवाद्यांना आज, मंगळवारी पुन्हा अटक करण्यात आली आहे. गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात हे दहशतवादी मध्यरात्री खांडवा येथील तुरुंग फोडून पळून गेले होते.

अधिक वाचा:मध्य प्रदेश : तुरुंगातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पुन्हा अटक

रामदेव बाबा सोनिया व राहुल गांधींच्या विरोधात प्रचार करणार

लखनौ - योगगुरु रामदेव बाबा यांनी येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधींविरोधात प्रचार करणार असल्याचे आज, मंगळवारी जाहीर केले आहे. लखनौ येथील एका कार्यक्रमात बोलतांना रामदेव बाबा यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या रायबरेली व अमेठी या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांच्याविरोधात प्रचार करण्याचा आपला हा मनोदय व्यक्त केला. यावेळी रामदेव बाबा यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधान पदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. मात्र त्यांनी आपला पाठिंबा हा भाजपला नसून केवळ मोदींना असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

अधिक वाचा:रामदेव बाबा सोनिया व राहुल गांधींच्या विरोधात प्रचार करणार