महावृत्त

दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन होण्याचा मार्ग आज, मंगळवारी मोकळा झाला असून सत्ता स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या मंत्रिमंडळातील पहिल्या टप्प्यातल्या मंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत. त्यात मनिष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन, राखी बिर्ला, गिरीश सोनी आणि सोमनाथ भारती यांचा समावेश आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी रामलीला मैदानाची निवड केली असून, या वेळी ते शपथ एकटेच घेतील, की आपल्यासोबत अन्य मंत्र्यांचाही समावेश करतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अधिक वाचा:दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा मुलगा भाजपात

अहमदाबाद - गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा मुलगा भरत याने आज, मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आर.सी.फालदू यांनी भरत पटेल यांचे पक्षात स्वागत केले. १९९८-९९मध्ये भाजपमध्ये असताना भरत यांनी गुजरात प्रदेश युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली होती. भरत यांना भाजपकडून सौराष्ट्रमधून उमेदवारी देण्यात येण्याची शक्‍यता आहे.

अधिक वाचा:गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा मुलगा भाजपात

वसुंधरा राजे मंत्रिमंडळात १२ सदस्यांचा समावेश

जयपूर -  राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा १२ सदस्यांचा समावेश करून विस्तार केला. यातील ९ मंत्र्यांना कॅबिनेटचा, तर तीन मंत्र्यांना स्वतंत्र पदभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी राज भवनातील एका शानदार समारंभात या सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

अधिक वाचा:वसुंधरा राजे मंत्रिमंडळात १२ सदस्यांचा समावेश

मिकाईल खोदोर्कोवस्की यांची सुटका

मॉस्को - दहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेले रशियातील पूर्वीचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले मिकाईल खोदोर्कोवस्की यांची सुटका करण्याच्या आदेशाला अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंजुरी दिली. 'मानवतावादी तत्त्वांनुसार मला माफी देण्यात यावी आणि यापुढील तुरुंगवासाच्या शिक्षेतून माझी सुटका करण्यात यावी. (पुतीन यांच्या) स्वाक्षरी केल्यापासून हा आदेश लागू होईल,' पुतीन यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे, असे वृत्त 'क्रेमलिन'ने दिले आहे.