महावृत्त

 ’आदर्श’ घोटाळा - अंतिम अहवाल राज्य सरकारनं फेटाळला

मुंबई - देशभर खळबळ माजवलेल्या आदर्श घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीच्या अहवालात राज्याच्या चार माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आलेत. पण, हा अहवाल राज्य सरकारनं फेटाळलाय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार भ्रष्ट नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आज दिसलं.
 ’आदर्श’ घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा अंतिम अहवाल राज्य सरकारनं आज, शुक्रवारी विधिमंडळात मांडला. यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर आणि राज्य मंत्रिमंडळातले राष्ट्रवादीचे मंत्री सुनिल तटकरे, राजेश टोपे यांच्यावर ताशेरे ओढण्यात आलेत. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पदाचा लाभ घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अधिक वाचा: ’आदर्श’ घोटाळा - अंतिम अहवाल राज्य सरकारनं फेटाळला

देवयानी खोब्रागडे अवमान प्रकरण – आरोप मागे घेण्यास अमेरिकेचा नकार

वॉशिंग्टन - अमेरिकेतील भारताच्या परराष्ट्र उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात असणारे आरोप मागे घेण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका यांच्यात वाद आणखी वाढला आहे. देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधातले आरोप अतिशय गंभीर असून ते मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता प्रश्न फक्त कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मेरी हर्फ यांनी स्पष्ट केलं आहे. भारताने देवयानीविरोधातला व्हिसा घोटाळ्याचा आरोप मागे घ्यावा. तसंच अमेरिकेने माफी मागावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास देवयानीला १५ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा:देवयानी खोब्रागडे अवमान प्रकरण – आरोप मागे घेण्यास अमेरिकेचा नकार

उद्योगांसाठीच्या वीजदरात आठ दिवसांमध्ये कपात - राणे

नागपूर - राज्यातील उद्योगांसाठी आकारण्यात येणारे वीजदर इतर राज्यांमधील दरांच्या तुलनेत जास्त आहेत. याचा परिणाम राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीवर होऊ नये यासाठी उद्योगांना आकारण्यात येणारे वीजदर येत्या आठ दिवसात कमी करण्यात येतील, असे आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधानसभेत दिले.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जाचक अटी व राज्यातील वाढते वीजदर यामुळे महाराष्ट्रातील उद्योजक अन्य राज्यांमध्ये जात आहेत. वाढत्या वीजदरांचा परिणाम औद्योगिक गुंतवणुकीवर होत असल्याबाबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना उद्योगमंत्री राणे यांनी उद्योगांसाठी आकारण्यात येणारे वीजदर जास्त असल्याचे मान्य केले. हे दर कमी करण्याबाबत आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली असून पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

अधिक वाचा:उद्योगांसाठीच्या वीजदरात आठ दिवसांमध्ये कपात - राणे

मोदींच्या मुंबईतील सभेसाठी उस्मानाबादेतून विशेष रेल्वे

उस्मानाबाद - भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुंबई येथे २२ डिसेंबर रोजी आयोजित नरेंद्र मोदी यांच्या महागर्जना सभेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून साडेसात हजार कार्यकर्ते जाणार आहेत. यासाठी विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आली आहे.  मुंबई येथील बांद्रा-कुर्ला संकुलावर २२ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला जाण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून पक्षाच्या प्रदेश शाखेच्या सहकार्याने आणि जिल्हा शाखेच्या प्रयत्नाने विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आली असून, त्यातून साडेसात हजार कार्यकर्ते जाणार आहेत.

अधिक वाचा:मोदींच्या मुंबईतील सभेसाठी उस्मानाबादेतून विशेष रेल्वे