महावृत्त

बब्बर खालसा संघटनेच्या अतिरेक्याला अटक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या पोलिसांनी आज, गुरूवारी बब्बर खालसा संघटनेच्या एका अतिरेक्याला अटक केली आहे. या अतिरेक्यावर भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने शीख फुटीरवादी गटांना अर्थसहाय्य आणि अन्य प्रकारची मदत केल्याचा आरोप आहे. अटक केलेल्या अतिरेक्याचे नावं बलविंदर सिंग असे असून तो मुळचा भारतीय आहे. त्याला उद्या शुक्रवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असून, आरोप सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येक गुन्ह्यात अडीच लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

देवयानी खोब्रागडे अपमान प्रकरण :अमेरिकेकडून दिलगिरी व्यक्त

वॉशिंग्टन - भारताच्या प्रभारी महावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत दिलेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अमेरिका नरमली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्याकडे काल, बुधवारी रात्री दूरध्वनीवरुन घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत परराष्ट्र सेवेतील अधिकार्‍याला देण्यात आलेल्या वागणूकीबद्दल चिंताही व्यक्त केली.

अधिक वाचा:देवयानी खोब्रागडे अपमान प्रकरण :अमेरिकेकडून दिलगिरी व्यक्त

आदर्श घोटाळा - अशोक चव्हाणांना दिलासा

मुंबई - राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आदर्श घोटाळा प्रकरणात अडकलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुध्द खटला चालविण्यास सीबीआयला नकार दिला आहे तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याचे आदेशही देण्यात आल्यामुळे चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श गैरव्यवहार प्रकरणात नाव गुंतल्याने चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

अधिक वाचा:आदर्श घोटाळा - अशोक चव्हाणांना दिलासा

देवयानी खोब्रागडेंच्या अपमानाचा भारत उगवणार सूड

नवी दिल्ली - अमेरिकेतील भारतीय दूतावासात वरिष्ठ अधिकारी असलेल्या देवयानी खोब्रागडे यांना मिळालेल्या अपमानजनक वागणुकीचा सूड उगविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून, भारतात राहणार्या अमेरिकन दूतावासातील समलिंगी संबंध ठेवणार्या जोडीदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन बेड्या ठोकण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.

अधिक वाचा:देवयानी खोब्रागडेंच्या अपमानाचा भारत उगवणार सूड