महावृत्त

नेपाळ करणार गाईंची आयात

काठमांडू - गोमातेच्या दूधाचे महत्त्व पटलेल्या नेपाळवासियांना गाईच्या दुधाचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी नेपाळ सरकार भारतातून तब्बल १०,००० गाईंची आयात करणार आहे. यासंदर्भात २१ डिसेंबर रोजी काठमांडू येथे भारत-नेपाळमधील सरकारी समितीच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती नेपाळचे वाणिज्यमंत्री माधव प्रसाद रेगमी यांनी दिली.

अधिक वाचा:नेपाळ करणार गाईंची आयात

आचारसंहितेआधी कायदा आणा - अण्णा हजारे

राळेगणसिध्दी - लोकपाल विधेयक मंजूर करुन कॉंग्रेस-भाजपसह देशातील सर्वच पक्षांनी देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे,असे गौरवोदगार अण्णा हजारे यांनी काढले. आता लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधी लोकपालचा कायदा आणा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी लोकसभेत लोकपालला मंजूरी मिळाल्यानंतर केले.

अधिक वाचा:आचारसंहितेआधी कायदा आणा - अण्णा हजारे

कॉंग्रेसमध्ये भरलेत समलैंगिक - बाबा रामदेव

नवी दिल्ली - समलैंगिक संबंधांच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून देशात खळबळ माजली असताना योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यावरून कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. ‘कॉंग्रेसमधील बहुतांश व्यक्ती समलैंगिक असावेत. त्यामुळेच ते समलैंगिक संबंधांचे समर्थन करीत आहेत,’ अशी बोचरी टीका रामदेव यांनी केली आहे.

अधिक वाचा:कॉंग्रेसमध्ये भरलेत समलैंगिक - बाबा रामदेव

प्रवासी बस आणि ट्रक यांच्या धडकेत २५ जण जखमी

नोएडा - उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेस महामार्गावर आज, मंगळवारी सकाळी प्रवासी बस आणि एका ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते, शिवाय चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.