महावृत्त

बसपा खासदार कादीर राणा यांना अटक

लखनौ - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी आज, मंगळवारी बहुजन समाज पक्षाचे खासदार कादीर राणा यांना अटक करण्यात आली. तसेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. राणा यांनी गेल्या ३० ऑगस्टला चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर काही दिवसातच मुझफ्फरनगरमध्ये जोरदार दंगल उसळली होती. तेव्हापासून राणा गायब होते. शेवटी आज, मंगळवारी त्यांनी आत्मसमर्पण केले.

विजयानंदमध्ये पुन्हा जॅक्सन वधाचा थरार

नाशिक (विश्वास शौचे) - १०४ वर्षांपूर्वी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये बालगंधर्वांचे नाटक ऐन रंगात आले असताना अवघ्या १७ वर्षांच्या अनंत कान्हेरे या तरुण क्रांतिकारकाने इंग्रज अधिकारी जॅक्सन याच्यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला. या घटनेने भारतीय स्वातंत्र्ययुध्दातील सशस्त्र क्रांतिपर्वाला नवी दिशा मिळाली होती. आता बरोबर १०४ वर्षांनंतर त्याच विजयानंद थिएटरमध्ये डिसेंबरच्या त्याच दिवशी व त्याच वेळी कान्हेरेंचा हा इतिहास '१९०९' या चित्रपटातून जीवंत होणार आहे. निर्माते अजय कांबळी व दिग्दर्शक अभय कांबळी यांनी क्रांतिकारक अनंत कान्हेरेंच्या जीवनावर बनविलेल्या १९०९ या चित्रपटाचा प्रीमियर शो २१ डिसेंबर या क्रांतिघटनेच्या दिवशी व सायंकाळी सात वाजण्याच्या वेळी विजयानंद थिएटरमध्ये होणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते व विजयानंद थिएटरचे संचालक विनय चुंबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक वाचा:विजयानंदमध्ये पुन्हा जॅक्सन वधाचा थरार

देवयानी खोब्रागडे अपमान प्रकरण : भारताकडून तीव्र प्रतिक्रीया

नवी दिल्ली – अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अपमानास्पद वागणूक देण्याची अमेरिकेची कृती सर्वस्वी अमान्य असल्याची संतप्त प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली असून या प्रकरणी अमेरिकेची भूमिका सर्वस्वी अमान्य असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी भारताने तीव्र संताप व्यक्त केला असून हे प्रकरण देशाने अत्यंत "गांभीर्याने' घेतले असल्याचे आणि त्याबाबत योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे सरकारतर्फे आज, मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट नाकारली. याआधी काल (सोमवार) लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार यांनीही अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट नाकारली होती. 

अधिक वाचा:देवयानी खोब्रागडे अपमान प्रकरण : भारताकडून तीव्र प्रतिक्रीया

विदर्भातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार

नागपूर – महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. . पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आज, मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार दि. भा. घुमरे, मेघनाथ बोधनकर, टी. बी. गोल्हर, लक्ष्मणराव जोशी, राजाभाऊ पोफळी, हरिष कांबळे, उमेश चौबे, एम. पी. अंधारे, जगन वंजारी, बबनराव नाखले, प्रकाश दुबे यांचा श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा:विदर्भातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार